नवीन आयुक्तांसाठी सत्ताधारी व विरोधकांकडून लॉबींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 01:04 PM2020-01-22T13:04:02+5:302020-01-22T13:04:22+5:30
जळगाव : मनपाचे विद्यमान आयुक्त डॉ.उदय टेकाळे हे ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर येणाऱ्या नवीन आयुक्तांसाठी मनपातील ...
जळगाव : मनपाचे विद्यमान आयुक्त डॉ.उदय टेकाळे हे ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर येणाऱ्या नवीन आयुक्तांसाठी मनपातील सत्ताधारी भाजप व विरोधक शिवसेनेकडून जोरदार मार्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजप आमदार सुरेश भोळे यांच्याकडून मीरा-भार्इंदर मनपाचे उपायुक्त दीपक पुजारी तर शिवसेनेकडून मनपाचे माजी उपायुक्त व सध्या नागपूर महापालिकेत असलेले राजेश कानडे यांच्या नावासाठी आग्रह धरला जात आहे.
महापालिकेत पदाधिकाऱ्यांची निवड करताना सत्ताधारी व विरोधकांकडून नेहमीच लॉबींग केली जाते. मात्र, काही वर्षांपासून आपल्या मर्जीतील किंवा मनपाची माहिती असलेल्या अधिकाºयांसाठी देखील सत्ताधारी व विरोधकांकडून मोर्चेबांधणी केली जाते. विद्यमान आयुक्त डॉ.उदय टेकाळे हे ३१ जानेवारीला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतरच्या आयुक्तांसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लॉबींग केली जात आहे. राज्यात शिवसेना-राष्टÑवादी व कॉँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आहे. तर मनपात भाजपाची सत्ता आहे तर विरोधात शिवसेना आहे. त्यामुळे विरोधकांकडून त्यांना परिचीत असलेल्या अधिकाºयाची शिफारस मंत्र्यांकडे केली जात आहे.
उदय टेकाळे यांचा दहा महिन्याचा कार्यकाळ
मनपाचे आयुक्त डॉ.उदय टेकाळे हे ३१ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. डॉ. टेकाळे यांनी १० महिने मनपाचा कारभार पाहिला. दहा महिन्यांच्या कार्यकाळात अनेक वर्षांचा हुडको कर्जाचा प्रश्न मार्गी लावण्यात डॉ.टेकाळेंचा मोठा वाटा आहे. यासह गेल्या सात वर्षांपासून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे थकलेले भाडे वसुलीसाठी देखील डॉ.टेकाळे यांनी चांगले प्रयत्न केले. गाळेधारकांकडून ५६ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. कमी कालावधीत डॉ.टेकाळे यांनी बरेच प्रश्न मार्गी लावले.
कानडेंना जळगाव मनपाचा अनुभव ; शिवसेनेशी जवळीक
शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांकडून मनपा आयुक्तपदी राजेश कानडे यांच्या नावासाठी आग्रह केला जात आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याव्दारे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजेश कानडे यांनी २०१७-१८ मध्ये जळगाव महापालिकेत सहाय्यक आयुक्त व उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे. तेव्हा मनपात खाविआची सत्ता होती. कानडे यांचे सेना नगरसेवकांशी चांगले सबंध आहेत. दरम्यान, महापौर सीमा भोळे यांनी राजीनामा दिला असला तरी आमदार सुरेश भोळे यांना मनपात काही प्रमाणात रस कायम असल्याचे दिसून येत आहे. आमदार भोळे यांनी देखील नवीन आयुक्तांसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मीरा-भार्इंदरचे उपायुक्त दीपक पुजारी यांच्यासाठी आमदार भोळे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. आमदार भोळे यांनी याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांची भेट घेवून पुजारी यांच्या नावासाठी शिफारस केली आहे. आता नवीन आयुक्त म्हणून कोण येतात ? याकडे लक्ष लागले आहे.