पिचर्डे जि.प.शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

By Admin | Published: June 16, 2017 03:51 PM2017-06-16T15:51:06+5:302017-06-16T15:51:06+5:30

मुख्याध्यापकांकडेच चार वर्ग. विद्याथ्र्याचे होतेयं शैक्षणिक नुकसान

Locals locked in Pichorda ZP School | पिचर्डे जि.प.शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

पिचर्डे जि.प.शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

googlenewsNext

 पिचर्डे, जि.जळगाव,दि.16- येथील जि. प. प्राथमिक विद्यामंदिरात 1 ते 4 वर्गाना कायमस्वरुपी शिक्षक नसल्याने वर्षापासून मुख्याध्यापकांनाच ही जबाबदारी पार पाडावी लागत आहे. विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी अखरे शुक्रवारी शाळेला कुलूप ठोकले व दखल घेईर्पयत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

शाळेला चार शिक्षक मिळेर्पयत कुलूप राहणार आहे. मात्र त्यानंतरही जि. प. व पं. स. विभागाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करीत पंचायत समितीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. मराठी शाळेत 1 ते 4 र्पयत वर्ग असून त्यात 150 विद्यार्थी आहेत. त्यानुसार येथे मुख्याध्यापक व 4 शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र मागील वर्षी शिक्षकांची बदली झाल्यानंतर नवीन शिक्षकांची नेमणूक झाली नाही. यासंदर्भात ग्रामस्थांचे ग्रा:हाणे त्यावेळेस ‘लोकमत’ मधून मांडल्यानंतर येथे वाक येथून 1 तात्पुरता व भडगाव येथून 1 विषयतज्ज्ञ दिले होते. तेव्हा पासून येथे कायमस्वरुपी शिक्षक नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु आहे. 15 रोजी शाळा उघडल्यावर विद्याथ्र्याच्या स्वागताला फक्त मुख्याध्यापक उपस्थित होते. पहिलीचे प्रवेश, जाणा:या विद्याथ्र्याना शाळा सोडल्याचा दाखला देणे ही कामे व 4 वर्ग सांभाळण्याची कसरत मुख्याध्यापकांना करावी लागली हे पाहून अखेरीस शालेय समितीचे पदाधिकारी व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष व्ही. एस. पाटील, राजेंद्र नारायण पाटील, उपसरपंच विनोद पाटील, धनराज भिकन पाटील, साहेबराव दशरथ पाटील, धनराज तुकाराम पाटील व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले.

Web Title: Locals locked in Pichorda ZP School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.