लॉकडाउन अन् आजीबार्इंचा क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:24 PM2020-04-24T23:24:13+5:302020-04-24T23:24:44+5:30

सध्याच्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असतानाही त्यात विरंगुळा करणाऱ्या आजीबार्इंविषयी लिहिताहेत ‘लोकमत’चे उपसंपादक विहार तेंडुलकर...

Lockdown and grandparents' class | लॉकडाउन अन् आजीबार्इंचा क्लास

लॉकडाउन अन् आजीबार्इंचा क्लास

Next

कोरोनाने अनेक बºयावाईट गोष्टी घडवल्या. दुभंगलेली माणसं मनानं जवळ आली, घराघरात बैठे खेळ होऊ लागले. एकत्र जेवण घेतलं जाऊ लागलं. शैक्षणिक संस्था बंद झाल्या तरीही आॅनलाईन क्लासेस सुरू आहेत. परीक्षा रद्द झाल्या असल्या तरीही मुलांना काहीतरी शिकवावं, त्यांनी काही नवीन शिकावं म्हणून नेहमी घरातील नातवंडं शोधणारी आजी आज त्यांच्यासोबत रमू लागलेय. नातवंडे, घरातील कर्तीसवरती माणसं आजीबार्इंना तशी सायंकाळीच भेटतात. या लॉकडाउनमुळे नातवंडांना आजीसाठी खूपच खूप वेळ आहे. आजी-नातवंडांचं नातं खूप घट्ट करणारा हा हंगाम.
यंदा उन्हाळी हंगामात उन्हाळी शिबिरे होतील की नाही, हे माहीत नाही. पण काही घरांमध्ये मात्र आजी-आजोबांनी आपल्या नातवंडांना अनेक उपक्रम शिकवत जणू उन्हाळी शिबिरच घेतले आहे. लॉकडाउनमुळे कुटुंबातील सर्वांचे सध्या ‘स्टे होम’ सुरू आहे. यावेळेचा कुणी कसा सदुपयोग करेल, हे सांगता येत नाही. अशात जळगाव येथील रत्नप्रभा गांधी या आजी अनोखी कलात्मकता वापरत नातवांनी संग्रहीत केलेल्या लग्नपत्रिका व कार्डशिटपासून भेटकार्ड, भेटपाकीटं, खेळणी, देवघरातील मखर व शाळेतील प्रकल्प तयार करण्याविषयी त्या मार्गदर्शन करतात. त्यांना हा छंद लहानपणापासूनच आहे. लॉकडाउनमधे सर्वत्र दुकाने बंद असल्याने नातवांसाठी लूडोचा व चेसचा छानसा गेम त्यांनी स्वत: हातानेच तयार केला आहे. लहान मुलांना त्या आपल्या कलेविषयी मार्गदर्शन करतात. त्यांनाही विविध उपक्रम करायला शिकवतात. यामुळे मुलेही या अनोख्या उपक्रमात आजींबरोबर रमून सहभागी होत आहेत.
प्लायवूडपासून तयार केलेला पाळणा स्वत: सजवला आहे. त्यांचे उल्लेखनीय कार्य म्हणजे शालवर ‘श्रीराम जयराम जय जय राम’ ही ओळ एक लाख वेळा लिहिली आहे. दिवसातील काही वेळ त्या धार्मिक पुस्तके वाचनात आणि मेडिकलमधे बसवून घालवितात. कुटुंबात रमताना लॉकडाउनमधील रिकाम्या वेळेत नवं काहीतरी करण्याचा या आजींचा ध्यास तरूणाईसमोर नक्कीच आदर्श ठरेल आणि हे सर्व धडे त्या नातवंडांनाही देतात. आज जळगावमध्ये अनेक मुलं बाहेर खेळताना दिसतात. मात्र गांधी आजींची नातवंडं आज आपल्या आजीभोवती नवनवीन काहीतरी शिकत आहेत. कोरोनामुळे नात्याच्या संध्याकाळी नव्याने पहाट झालेय, असं आता वाटू लागलंय.
-विहार तेंडुलकर, जळगाव

Web Title: Lockdown and grandparents' class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.