नवीन वर्षातही लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:16 AM2020-12-31T04:16:56+5:302020-12-31T04:16:56+5:30
जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत कोरोना विषाणू ...
जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.
२२ डिसेंबर २०२०च्या आदेशान्वये जळगाव शहर महानगरपालिका सर्व नगरपालिका, सर्व नगर परिषद क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर आता लॉकडाऊनचा कालावधी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढविला आहे.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहणार असून, या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित शिक्षेस पात्र राहतील, असेही आदेशात म्हटले आहे.