लॉकडाऊनचे निर्बंध हटले, अपघातातील मृत्यू वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:54+5:302021-07-20T04:12:54+5:30

जळगाव : लॉकडाऊनचे निर्बंध हटताच रस्त्यावर वाहनांचा वेग वाढला. हा वेग इतका वाढला की दहा दिवसांत शहर व परिसरात ...

Lockdown restrictions lifted, accidental deaths increase! | लॉकडाऊनचे निर्बंध हटले, अपघातातील मृत्यू वाढले !

लॉकडाऊनचे निर्बंध हटले, अपघातातील मृत्यू वाढले !

Next

जळगाव : लॉकडाऊनचे निर्बंध हटताच रस्त्यावर वाहनांचा वेग वाढला. हा वेग इतका वाढला की दहा दिवसांत शहर व परिसरात सलग अपघात होऊन त्यात दहा जणांचा बळी गेला. रस्त्यांची निर्मिती झाल्याने वाहने सुसाट धावू लागली आहेत, त्यामुळे आपल्या वाहनाचा वेग किती आहे, हे वाहनधारकालाही कळत नाही. ओव्हरटेक करतानाच सर्वाधिक अपघात झालेले आहेत. जानेवारी ते जुलै या साडेसहा महिन्यांत २५२ जण ठार झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघातात दीड वर्षात १०५२ अपघात झाले, त्यात ६७९ जणांचा मृत्यू झाला. १४७३ जण जखमी झाले आहेत. २०१८ ते मे २०२१ या साडेतीन वर्षांत २ हजार ७३९ अपघात झाले आहेत. त्यात १ हजार ५५५ जणांचा मृत्यू झाला आहे. ३ हजार ९५७ जण जखमी झालेले आहेत. विशेष म्हणजे या अपघातांमध्ये तरुणांचा जीव गेलेला आहे. कोणी घरातील कर्ता तरुण, तर कोणाचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेले तर कोणाचा साखरपुडा झालेला असेच तरुण अपघातात ठार झालेले आहेत. काही घटनांमध्ये वंशाचा दिवा असलेला एकुलता मुलगाच कुटुंबाने गमावला आहे. खराब व चांगले झालेले रस्ते या अपघातांना कारणीभूत आहे. मद्यप्राशन व सुसाट वेगाने वाहने चालविल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, यात सर्वाधिक तरुणांचाच बळी जात आहे.

लॉकडाऊनमध्येही वाढले अपघात..

लॉकडाऊन काळात अनेक निर्बंध असल्याने अनावश्यक बाहेर फिरणारे असतील किंवा सरकारी बसेसला परवानगी नव्हती. त्यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी असला तरी या काळात मोठ्या प्रमाणात अपघात होऊन त्यात अनेकांचा जीव गेला आहे. यंदाच्या मार्च ते मे या तीन महिन्यांत ११७ अपघातात १०७ जण ठार झाले, तर ५३ जण जखमी झाले. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये ४० वर्षांच्या आतील युवकांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या महिन्यात गुजराल पेट्रोल पंपाजवळ बापलेक ठार झाले, तर नशिराबादजवळ साखरपुडा झालेला व सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेला असे दोन तरुण अपघातात ठार झाले.

असे आहेत सहा महिन्यांतील अपघात

महिना ठार

जानेवारी ३७

फेब्रुवारी ३५

मार्च ३५

एप्रिल ३१

मे ५१

जून ५३

सात दिवसांत दहा ठार जण

१० जुलै : वेले, ता.चोपडा येथे २ तरुण ठार.

११ जुलै : नशिराबादजवळ १ ठार.

१२ जुलै : पाळधी, ता.जामनेर येथे ३ ठार.

१३ जुलै : शिरसोली-रामदेववाडी दरम्यान १ ठार.

१४ जुलै : महामार्गावर बांभोरीजवळ १ ठार.

१७ जुलै : शिरसोली येथे १ तरुण ठार.

१८ जुलै : महामार्गावर विद्यापीठासमोर १ तरुण ठार.

Web Title: Lockdown restrictions lifted, accidental deaths increase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.