लॉकडाऊनने दाखविला पर्यावरण संवर्धनाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:33 AM2020-12-12T04:33:17+5:302020-12-12T04:33:17+5:30

अजय पाटील, गेल्या एक दशकात मनुष्याने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र, प्रगतीचा वेग वाढवत असताना निसर्गाची मोठ्या प्रमाणात ...

Lockdown shows the way to environmental conservation | लॉकडाऊनने दाखविला पर्यावरण संवर्धनाचा मार्ग

लॉकडाऊनने दाखविला पर्यावरण संवर्धनाचा मार्ग

Next

अजय पाटील,

गेल्या एक दशकात मनुष्याने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र, प्रगतीचा वेग वाढवत असताना निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानीदेखील काही दशकात होत गेली आहे. यामुळे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत जात असून, येत्या काळात मनुष्याला पर्यावरणाच्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. २०२० या वर्षाच्या सुरुवातीपासून संपूर्ण जगावर निर्माण झालेली ‘कोरोना’ची महामारीदेखील निसर्गाने मानवाविरोधात उगवलेला एकप्रकारे सूडच आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मार्च २०२० पासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. हे लॉकडाऊन कोरोनाला आडा घालण्यासाठी जाहीर करण्यात आले असले तरी या लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगालाच पर्यावरण संवर्धनाचा एक मार्ग सापडला आहे.

मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कोरोनापासून तर बचाव झालाच, मात्र दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे पर्यावरणाचा होणारा ऱ्हासदेखील थांबविण्याचा एक मार्ग या लॉकडाऊनच्या काळात सापडला आहे. लॉकडाऊनच्या काळात जल, ध्वनी व वायुप्रदूषणात मोठी घट झालेली पहायला मिळाली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात आहे. यामुळे जे लॉकडाऊनमध्ये कमावले ते गमावण्याची भीती निर्माण होत आहे. मात्र, पर्यावरण संवर्धन करायचे असेल तर महिन्यात एकवेळेस लॉकडाऊन पाळण्याची गरज आता निर्माण झाली आहे. यासाठी सर्वच स्तरातून पुढाकार घेण्याची गरज आहे. कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. कोरोनाने जरी जगभरात धुमाकूळ घालून अनेकांचे बळी गेले असले तरी हा आजार मानवी समाजाला एक मोठी शिकवण देऊन गेला आहे. अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी जे प्रयत्न शासन, प्रशासन व पर्यावरण संघटनांकडून केले जात होते ते आज कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनने करून दाखवले.

मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रकारच्या प्रदूषणात मोठी घट झाली. जळगाव शहराचा विचार केल्यास मार्च ते जून महिन्यात प्रदूषणाचा स्तर १०० ते १२० पॉइंटवर आला होता, जो स्तर नेहमी २५० पर्यंत कायम होता. एप्रिल महिन्यात हा स्तर ६० पॉइंटपर्यंत खाली आला होता. लॉकडाऊनच्या काळातच कार्बन मोनोक्साईड, सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईडच्या प्रमाणात घट झाली होती. मानवाने ठरविले तर पर्यावरणाचे संवर्धन करता येऊ शकते. जून महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर प्रदूषणाचा स्तर पुन्हा वाढत आहे. लॉकडाऊनने दिलेला पर्यावरण संवर्धनाच्या मार्गावरून मानव पुन्हा भरकटत गेला तर भविष्यात येणाऱ्या पिढीला विनाशाशिवाय काहीही मिळणार नाही. कोरोनाने जरी हानी केली असली तरी या हानीतून नक्कीच बोध घेण्याची गरज आहे. कोरोनाने अनेक चांगल्या सवयीदेखील मानवाला लावल्या आहेत. आरोग्याची काळजी घेताना नागरिक बऱ्याच ठिकाणी सायकलचा वापर करू लागले आहेत. हा बदलदेखील पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने तीन महिने घरात स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले होते. हवामान बदलामुळे होणारी हानी ही कोरोनापेक्षाही अधिक भयंकर स्वरुपाची असू शकते. त्यामुळे महिन्यात एक वेळेस जरी जनता कर्फ्यू पाळला तर बऱ्याच प्रमाणात निसर्ग परिणामी स्वत:चादेखील भविष्यात येणाऱ्या संकटांपासून बचाव होऊ शकतो.

Web Title: Lockdown shows the way to environmental conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.