वीज उपकेंद्राला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 03:22 PM2017-08-18T15:22:17+5:302017-08-18T15:23:55+5:30
लोणपिराचे येथील प्रकार
गोंडगाव ता. भडगाव, दि. 18 - जवळच असलेल्या लोणपिराचे येथील नूतन वीज उपकेंद्राला वीज समस्येने त्रस्त झालेल्या परिसरातील शेतक:यांनी कुलूप ठोकले. हा प्रकार 18 रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडला.
याबाबत वृत्त असे की, गेल्या एक महिण्यापासून वीज पुरवठा सुरळीत नाही. दिवसभरात आठ तासांचे लोडशेडींग आणि उर्वरित वेळेत देखील वीज फक्त अर्धा तास असते. दिवसभरात दोन तास देखील वीज शेतक:यांना मिळत नाही. अशातच निसर्गाने पाठ फिरवली असून पिके कोमजू लागली आहेत. आहे त्या पाण्याचाही पिकांना विजेअभावी वेळेत भरणा करता येत नाही. वेळोवेळी महवितरणशी याबाबत संपर्क साधूनही काही उपयोग होत नसल्याने संताप व्यक्त होत होता. सर्वच बाजुने शेक:यांना त्रास सहन करावा लागतोय. याचा उद्रेक 18 रोजी झाला.
कनाशी येथील युवासेना तालुका प्रमुख हर्षल संजय पाटील, लोणपिराचे येथील सरपंच विजय सुधाकर पाटील, गोविंद रघुनाथ पाटील सुरेश पांडूरंग पाटील, राजेंद्र सदा पाटील, अशोक रामभाऊ पाटील, अभिमन पाटील, मधुकर पाटील, बोरनार सरपंच पी. डी. माळी, पोलीस पाटील प्रभाकर पाटील, उत्तम पुना महाजन, सचिन रविंद्र भोपे, भाऊसाहेब पांडुरंग पाटील, घुसर्डी सरपंच ज्ञानेश्वर ओंकार पाटील यांच्यासह परिसरातील शेतक:यांनी वीज उपकेंद्राला कुलूप ठोकले.
चाळीसगावहून लोणपिराचे वीज केंद्राला वीज जोडणी केली आहे. परंतु कजगाव ते लोणपिराचे दरम्यान वारंवार तार तुटून जात होता. त्यामुळे हा प्रश्न उद्भवला. मी तात्काळ कोळगाव उपवीज केंद्रावरुन वीज जोडण्यास सांगितले आणि जोडलीही गेली.
- किशोर पाटील, आमदार
वीज पुरवठा अनियमीत आहे. पाहिजे त्या प्रमाणात वीज पुरवठा होत नाही. लोडशेडींग वेळेव्यतीरीक्तही वीज खंडीत होते. महावितरण याबाबत उडवाउडवीचे उत्तरे देते.
-विजय पाटील, सरपंच लोणपिराचे
पाऊस पडत नसल्याने ब:याचशा शेतक:यांच्या मोटर चालू असतात. लोणपिराचे येथे 132 के. व्ही. व्होल्टचे वीज केंद्र नसल्याने परिपूर्ण लोड उचलला जात नाही. यामुळे हा प्रश्न उद्भवतो. परंतु सध्या कोळगाव वीज केंद्रावरुन हा प्रश्न मार्गी लावला आहे.
- विजय पवार, सहायक अभियंता, कोळगाव