तोंडापूर ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2017 03:12 PM2017-06-19T15:12:37+5:302017-06-19T15:12:37+5:30

पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांनी सरपंचांना घातला घेराव

Locked to the Gram Panchayat of the Gandhapur | तोंडापूर ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

तोंडापूर ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

Next

ऑनलाईन लोकमत

तोंडापुर ता.जामनेर,दि.19- तोंडापूर गावात पाणी पुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध म्हणून अंबिका नगर भागातील महिला व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकत सरपंचांना घेराव घातल्याची घटना सोमवारी सकाळी झाली.
तोंडापूर येथील अंबिका नगर भागात गेल्या महिनाभरापासून पाणी येत नाही. तसेच जे पाणी येते ते गढूळ व अवस्वच्छ असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना होती. सोमवारी सकाळी ग्रामस्थ व महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालय गाठले. मात्र या ठिकाणी कुणीच नसल्याने महिलांनी कुलूप ठोकले.
त्यानंतर महिला व ग्रामस्थांनी सरपंच प्रकाश सपकाळ यांच्या घराजवळ येत गढूळ व दूषित पाण्याचा पाण्याने भरलेला हंडा जमिनीवर ओतून निषेध नोंदविला.
 
अंबिका नगर भागातील पाण्याच्या पुरवठय़ासाठी तयार केलेली बोअरवेलचे पाणी कमी झाले आहे. येत्या आठ दिवसात या भागात दुसरी बोअरवेल करून लवकरच पाण्याचा  पुरवठा केला जाईल 
- प्रकाश सपकाळ, सरपंच, तोंडापूर.

Web Title: Locked to the Gram Panchayat of the Gandhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.