जळगावात लॉजमध्ये थांबणा:यांची थेट पोलिसात होणार नोंद

By Admin | Published: April 20, 2017 10:58 AM2017-04-20T10:58:15+5:302017-04-20T10:58:15+5:30

बाहेरून येऊन जळगाव शहरात लॉज व हॉटेल्समध्ये थांबणा:या प्रत्येक व्यक्तीची आता थेट पोलिसात नोंद होणार आहे.

Locked in Jalgaon Lodge to be directly policed | जळगावात लॉजमध्ये थांबणा:यांची थेट पोलिसात होणार नोंद

जळगावात लॉजमध्ये थांबणा:यांची थेट पोलिसात होणार नोंद

googlenewsNext

 जळगाव,दि.20- बाहेरून येऊन जळगाव शहरात लॉज व हॉटेल्समध्ये थांबणा:या प्रत्येक व्यक्तीची आता थेट पोलिसात नोंद होणार आहे. त्यासाठी ‘सीटी व्हिजिटर्स इन्फॉर्मेशन रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टीम्स’ हे नवीन तंत्रज्ञानात अद्ययावत झाले असून शहरात 1 मे पासून हे तंत्रज्ञान अद्ययावत करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी हॉटेल व लॉजचालकांना दिल्या.

नाशिक येथील कंपनीने ‘सीटी व्हिजिटर्स इन्फॉर्मेशन रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टीम्स’ हे नवीन तंत्रज्ञानात अद्ययावत केले आहे. हॉटेल, लॉज व निवास या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी कशी करायची व पोलिसांना त्याची कशी माहिती मिळू शकते याची माहिती तज्ज्ञ कैलास राजपूत यांनी दिली. 
 बाहेरच्या गुन्हेगारांवर लक्ष
घरफोडी, दरोडे, सोनसाखळी लांबविणे यासारख्या घटनांमध्ये आरोपी हे बाहेरगावचे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी शहरातील हॉटेल व लॉजेसची तपासणी केली होती. त्यांच्याकडे बाहेरुन येणा:या व्यक्तींची पुरेसी माहिती नसल्याचे आढळून आले होते. दरम्यान, गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार घटना घडण्याच्या काही दिवस आधी शहरात येऊन लॉज व हॉटेल्समध्ये वास्तव्याला राहत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे बाहेरुन येणा:या व्यक्तीची थेट पोलिसांना माहिती मिळावी यासाठी नाशिकच्या तज्ज्ञाला पाचारण करण्यात आले होते.
एका महिन्याचे रेकॉर्ड ठेवा
हॉटेल व लॉजमध्ये प्रत्येक मालकाने दर्शनी भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक असून त्याचे किमान एक महिन्याचे रेकॉर्डिग साठवून ठेवण्याच्या सूचना डॉ.सुपेकर यांनी दिल्या. बाहेरून येणा:या प्रत्येक व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकाची नोंद घेऊन ओळखीसाठी आधारकार्ड, वाहनाचा परवाना याची ङोरॉक्स प्रत ठेवणे आवश्यक आहे. संशयास्पद व्यक्तीच्या बाबतीत पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी. सी फॉर्म ऑनलाईन करावे व परदेशातील नागरिकांची नोंद घ्यावी व त्याची प्रत पोलिसांना द्यावी अशा सूचना सुपेकर यांनी दिल्या.

Web Title: Locked in Jalgaon Lodge to be directly policed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.