पाचोरा नगरभूमापन कार्यालयात ठोकले कुलूप

By Admin | Published: April 21, 2017 03:02 PM2017-04-21T15:02:12+5:302017-04-21T15:02:12+5:30

उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयात जनतेची कामे होत नसल्याने वैतागलेल्या नागरिकांसह शिवसैनिकानी शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आंदोलन करीत भूमी अभिलेख कार्यालयाला कुलूप ठोकले.

Locked locks in Pachora Nagarwamapan office | पाचोरा नगरभूमापन कार्यालयात ठोकले कुलूप

पाचोरा नगरभूमापन कार्यालयात ठोकले कुलूप

googlenewsNext

 पाचोरा, दि.21- उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयात जनतेची कामे होत नसल्याने वैतागलेल्या नागरिकांसह शिवसैनिकानी शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आंदोलन करीत भूमी अभिलेख कार्यालयाला कुलूप ठोकले. 

नगरभूमान कार्यलयात जनतेची कामे होत नाहीत. कामे ब:याच महिन्यांपासून खोळंबली आहेत. नागरिक पार वैतागलेले असून रखरखीत उन्हामुळे फे:या मारून देखील नागरिकांचे समाधान होत नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारवकर यांचे नेतृतवाखाली शिवसैनिक जाब विचारण्यासाठी 21 रोजी दुपारी कार्यालयात धडकले. उपअधीक्षक सुषमा पवार कार्यालयात उपस्थित नव्हत्या. तसेच मुख्यलिपीक देखील उपस्थित नसल्याने संताप व्यक्त करून नागरिकांसह शिवसैनिकांनी उपअधीक्षकांच्या कार्यालयाला  कुलूप ठोकले. यावेळी पाचोरा शहर प्रमुख किशोर बारावकर, गंगाराम पाटील , युवासेनेचे जितेंद्र पेंढारकर, शेख जावेद, अरुण ओझा यांचेसह शिवसैनिक उपस्थित होते. 
कामावर हजर झाल्यावर कामे होणार 
 या प्रकरणी ‘लोकमत’ने उपअधीक्षक सुषमा पवार यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सध्या आजारी असल्यामुळे सुटीवर असल्याचे सांगितले. सोमवारी कामावर हजर झाल्यावर प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रय} राहील, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Locked locks in Pachora Nagarwamapan office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.