भोकरी येथील उर्दू शाळेस ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2017 03:59 PM2017-07-06T15:59:53+5:302017-07-06T16:00:51+5:30
भोकरी येथील जि.प. उर्दू शाळेत गेल्या तीन वर्षापासून शिक्षकांची संख्या अपूर्ण आहे.
Next
ऑनलाईन लोकमत
वरखेडी ता.पाचोरा,दि.6- भोकरी येथील जि.प. उर्दू शाळेत गेल्या तीन वर्षापासून शिक्षकांची संख्या अपूर्ण आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही शिक्षकांची नियुक्ती केली जात नसल्याच्या निषेधार्थ सरपंच व ग्रा.पं.सदस्यांनी गुरुवारी शाळेला कुलूप ठोकले.
जिल्हा परिषद उर्दू शाळा भोकरी येथे गेल्या दोन-तीन वर्षापासून शिक्षक संख्या अपूर्ण आहे. अनेकवेळा मागणी करूनही अपूर्ण शिक्षक संख्या पूर्ण करण्याकडे वरिष्ठ गांर्भीयाने विचार करत नसल्याने व यामुळे विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गुरुवारी भोकरी येथील सरपंच सलमाबी रशीद काकर,उपसरपंच फारुख मुसा, ग्रामपंचायत सदस्य डॉ.रशीद काकर, बाबू अब्दुल, कडू शे.रहीम, शफी महंमद, सायराबी हसन, फरीदाबी हकीम, गुलाब गफ्फार, नसिबाबी इब्राहीम, उस्मान गमीर, इलीयास जुम्मा, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जाकीर रशीद व ग्रामस्थ,माजी पंचायत समिती सभापती इस्माईल हाजी फकीरा, सलीम अब्दुल, हमीद अकबर, इस्माईल जुम्मा, हाजी युनुस, हमीद अकबर यांनी शाळेला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला.जोर्पयत शिक्षक नियुक्त केले जात नाही तोर्पयत शाळेचे कुलूप उघडणार नाही अशी भूमिका यावेळी घेण्यात आली.
या घटनेनंतर गट शिक्षणाधिकारी जे.टी.महाजन व केंद्रप्रमुख आर.डी.सावकारे यांनी तत्काळ भेट देत संबंधितांची समजूत घालण्याचा प्रय} केला मात्र आंदोलनकांनी माघार घेतली नाही.