अडावद येथे कजर्बाजारी शेतक:याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 05:26 PM2017-07-18T17:26:37+5:302017-07-18T17:26:37+5:30
नापिकी व कर्जबाजारीपणामुळे अडावद येथील शेतकरी एकनाथ भानुदास महाजन (46) यांनी मंगळवारी विषारीद्रव्य सेवन करून आत्महत्या केली.
Next
>ऑनलाईन लोकमत
चोपडा,दि.18 - नापिकी व कर्जबाजारीपणामुळे अडावद येथील शेतकरी एकनाथ भानुदास महाजन (46) यांनी मंगळवारी विषारीद्रव्य सेवन करून आत्महत्या केली.
एकनाथ महाजन यांच्याकडे 10 बिघे शेती आहे. वडील वृद्ध असल्याने, शेती करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्यावर विकासोचे एक लाख 30 हजार रूपये कर्ज आहे. गेल्या तीन वर्षापासून शेती मालाचे उत्पादन खर्च निघेल इतका भाव न मिळाल्याने कर्ज वाढतच गेले. पेरणीसाठी पैसा कसा उभारावा या चिंतेत असताना एकनाथ महाजन यांनी चार दिवसांपूर्वी चोपडा येथे भुईमूग शेंग विक्रीस काढली. ती फक्त 3200 रुपये क्विंटल गेल्याने त्यातून आलेल्या नैराश्याने त्यांना ग्रासले. त्यांनी 17 रोजी शेतात विषारी द्रव प्राशन केले. त्यांच्यावर चोपडा येथील खाजगी रुग्णालयात त्यांचेवर उपचार सुरू असताना 18 रोजी पहाटे चार वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, प}ी दोन मुले, मुलगी आहे.