लोहारा पोलीस दूरक्षेत्र बनले ‘शोपीस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 06:02 PM2019-07-20T18:02:30+5:302019-07-20T18:02:58+5:30
दुर्लक्ष होत असल्याने गुन्हेगारीत वाढ । १८ गावांची सुरक्षा व्यवस्था ‘रामभरोसे’
लोहार, ता.पाचोरा : १८ गावांच्या सुरक्षेचा भार असलेल्या पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोहारा पोलीस दूरक्षेत्र हे केवळ ‘शोपीस’ ठरले आहे. या दूरक्षेत्रात अधिकृत तीन पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती असली तरी अनेकदा या दूरक्षेत्रात एकही कर्मचारी दिसुन येत नाही.
कर्मचाºयाअभावी हे दूरक्षेत्र कार्यालय बºयाचदा बंदच असते. बहुतेकवेळा तिघांपैकी एक रजेवर असतो तर दुसरा कर्मचारी पिंपळगाव हरेश्वर येथे पोलिस स्टेशन तत्पुरता वर्ग केलेला असतो. येथे एकच कर्मचारी प्रत्यक्ष काम करतांना दिसुन येतो. त्यातही हा कर्मचारी जर न्यायालयाच्या कामा निमित्ताने बाहेर गेला तर मात्र हे पोलिस दूरक्षेत्र बंदच असते. अशा प्रकारे अठरा गावांच्या सुरक्षेचा प्रश्न राम भरोसे सुरु आहे. त्यामुळे या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले दिसुन येते. लोकवर्गणीतून बांधले कार्यालय
येथील पोलीस दूरक्षेत्रासाठी २००६ मध्ये ग्रामपंचयतीने जवळपास दोन एकर जागा उपलब्ध करुन दिली. याजागेवर सुसज्ज ईमारत गावकºयांनी लोकवर्गणीतून बांधून दिलेली आहे. केवळ इमारतच बांधली असे नाही तर या इमरतीत संगणक, प्रिंटर, इंटरनेट आदी सुविधा यासुद्धा गावकºयांच्या मदतीने येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मात्र पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या सर्व सुविधा निरुपयोगी ठरत आहेत.
गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ
येथील पोलिसांचा गावकºयांशी सु संवाद होत नसल्याने गावातील प्रतिष्ठित मंडळी पोलिसांपासून दोन हात दुरच रहाणेच पसंत करतात. पोलिसांचा दराराच नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळीनी डोके वर काढल्याचे दिसून येत. याचे भविष्यात मोठे दुष्परिणाम दिसुन आल्या शिवाय रहाणार नाही हे मात्र नक्की .
निवासस्थानेही पडली ओस
येथील दोनएकर क्षेत्रात अत्याधुनिक कार्यालया सोबतच पोलिसांना कुटुंबा सोबत राहता यावे म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात चार निवासस्थाने बांधून तयार आहते. मात्र येथे क्वचितच पोलिस मुक्कामाला दिसुन येतात.
जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
एखाद्या पोलिस स्टेशनला देखील लाजवेल असे येथील पोलीस दूरक्षेत्र सध्या केवळ ‘शोपीस’ झाले आहे. याकडे जिल्हा पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घलावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.