Lok Sabha Election 2019 : शहरी मतदारांचा कौल मिळवण्याची भाजप व राष्टÑवादीची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:16 PM2019-04-18T12:16:36+5:302019-04-18T12:18:46+5:30

राष्टÑवादीकडूनही जोमाने प्रचार

Lok Sabha Election 2019: The BJP and the Nation - the plaintiffs' struggle for urban polling | Lok Sabha Election 2019 : शहरी मतदारांचा कौल मिळवण्याची भाजप व राष्टÑवादीची धडपड

Lok Sabha Election 2019 : शहरी मतदारांचा कौल मिळवण्याची भाजप व राष्टÑवादीची धडपड

googlenewsNext

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीेत शहरी मतदारांनी भाजपाला कौल दिला होता. त्यामुळे शहरी मतदारांवर डोळा ठेऊन युती व आघाडीकडून व्यूहरचना सुरू असल्याचे दिसून येत आहे.
गेल्यावेळी २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेने शहरी मतदारांनी भाजपाला कौल दिला होता. मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात भाजपने आघाडी मिळविली होती. शहरी मतदारांच्या जोरावर ए.टी. पाटील यांनी राज्यातील दोन नंबरचे म्हणजे साडेतीन लाखांपेक्षा अधिक मतांचे मताधिक्य मिळविले होते.
परिस्थितीत बदल
यावेळी मात्र परिस्थितीत बदल दिसून येत आहे. केंद्रातील भाजप सरकारचे अनेक निर्णय हे वादग्रस्त ठरले आहेत. या बरोबरच सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यात या सरकारला यश मिळू शकलेले नाही. नेमके हेच भांडवल करून राष्टÑवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर हे मतदारांसमोर जात आहेत. मतदारांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न पाणी हाच आहे. या बरोबरच शेतीचे प्रश्नही गंभीर आहेत. बदलेली करनिती, नोटबंदी याचा परिणाम उद्योगांवर, शहरी भागावर झाला आहे. कोणतीही लाट हा प्रकार यावेळी दिसत नाही. शहरी मतदारांना आपल्याकडे वळविण्यावर युती-आघाडीची कसरत सुरू आहे. भाजपनेही यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
या लोकसभा मतदार संघातील जळगाव शहर, अमळनेर, पाचोरा मतदार संघात युतीत उघड बेबनाव होता. अमळनेरमध्ये तर भाजपाच्या गटबाजीचे शक्तीप्रदर्शन झाले. ते एवढे विकोपाला गेले की व्यासपीठावर जलसंपदा मंत्र्यांच्या समोर माजी आमदार बी.एस. पाटील यांना मारहाण झाली याचे परिणाम या क्षेत्रात होऊ शकतात. डॅमेज कंट्रोलसाठी येथे प्रयत्न सुरू आहेत.
कोणत्या भागात कोणाचा आहे होल्ड?
मुस्लीमबहुल, दलित वस्ती भागात बहुजन वंचित आघाडी व एमआयएमच्या उमेदवारांना प्रतिसाद लाभत आहे.
एरंडोल, पारोळा, जळगाव, चाळीसगाव या मतदार संघात भाजपाचा होल्ड आहे. तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांवर या पक्षाची सत्ता आहे.
पारोळ्यातील आमदार डॉ. सतीश पाटील हे राष्टÑवादीचे आहेत. आगामी काळात विधानसभा निवडणुका असल्याने त्यांनीही यावेळी शक्तीपणाला लावली आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019: The BJP and the Nation - the plaintiffs' struggle for urban polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.