Lok Sabha Election 2019 : लोकमत स्पेशल रिपोर्ट - दोन पंचवार्षिकमध्ये ३३ पैकी २९ उमेदवारांचे डिपॉझीट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:27 PM2019-04-18T12:27:05+5:302019-04-18T12:27:57+5:30

जळगाव लोकसभा मतदारसंघातील चित्र

Lok Sabha Election 2019: Lokmat Special Report - deposits of 29 candidates out of 33 in two quarters | Lok Sabha Election 2019 : लोकमत स्पेशल रिपोर्ट - दोन पंचवार्षिकमध्ये ३३ पैकी २९ उमेदवारांचे डिपॉझीट जप्त

Lok Sabha Election 2019 : लोकमत स्पेशल रिपोर्ट - दोन पंचवार्षिकमध्ये ३३ पैकी २९ उमेदवारांचे डिपॉझीट जप्त

Next

जळगाव : लोकसभा निवडणुकीत एरंडोल मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ साली जळगाव लोकसभा मतदारसंघ झाला़ या मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या दोन पंचावार्षिक निवडणुकीत ३७ पैकी ३१ उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झालेले आहे़
भाजप आणि राष्ट्रवादी सोडले तर अन्य पक्षीय उमेदवारांना या निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवता आलेला नाही़ २००९ पासून या मतदारसंघात भाजपचेच वर्चस्व राहिलेले आहे़ त्या खालोखाल राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मते मिळाली आहे़ गेल्या निवडणुकीत २० पैकी ९ उमेदवार अपक्ष होते़ तर २००९ साली ५ अपक्षांनी निवडणुक लढविली होत़ी या सर्वांचेच डिपॉझीट जप्त झाले होते़ दर पंचवार्षीकला निवडणूक लढविणाऱ्याचंी संख्या वाढत गेल्याचे दिसते, यंदा ती पुन्हा कमी झाली आहे़
डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?
एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.

Web Title: Lok Sabha Election 2019: Lokmat Special Report - deposits of 29 candidates out of 33 in two quarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.