Lok Sabha Election 2019 : दोन पंचवार्षिकमध्ये ३९ पैकी ३५ उमेदवारांचे डिपॉझीट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:30 PM2019-04-20T12:30:24+5:302019-04-20T12:31:15+5:30
रावेर लोकसभा मतदारसंघातील चित्र
जळगाव : लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ साली रावेर लोकसभा मतदारसंघ झाला़ या मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत ३९ पैकी ३५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले आहे़
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडले तर अन्य पक्षीय उमेदवारांना या निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवता आलेला नाही़ २००९ पासून या मतदारसंघात भाजपचेच वर्चस्व राहिलेले आहे़ त्या खालोखाल राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मते मिळाली आहे़
गेल्या निवडणुकीत २० पैकी १० उमेदवार अपक्ष होते़ तर २००९ साली १२ अपक्षांनी निवडणूक लढविली होत़ी. या सर्वांचेच डिपॉझिट जप्त झाले होते़
दर पंचवार्षिकला निवडणूक लढविणाऱ्याचंी संख्या वाढत गेल्याचे दिसते, यंदा ती पुन्हा कमी होऊन १२ उमेदवार रिंगणात आहेत. यात अपक्षांची संख्या केवळ चारच आहे.
डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?
एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.