Lok Sabha Election 2019 : मतदान साहित्य केंद्रांवर रवाना होण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:39 PM2019-04-22T12:39:59+5:302019-04-22T12:40:47+5:30
एकलव्य क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सकाळपासून लगबग
जळगाव : १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात २३ रोजी सकाळी ७ वाजता मतदानास प्रारंभ होणार असून त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्र व साहित्यासह कर्मचारी २२ रोजी रवाना होण्यास सुरुवात झाली. शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली असून मतदार व कर्मचाऱ्यांनी केंद्रांवर मोबाईलचा वापर करू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील ३६१७ मतदार केंद्रांवर सकाळी सात वाजता मतदानास प्रारंभ होईल. त्यासाठी २२ रोजी सकाळी आठ वाजेपासून मतदान यंत्र व इतर साहित्य कर्मचाºयांना वितरित करण्यात आले. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी एकलव्य क्रीडा संकुलाच्या प्रांगणात साहित्य वितरित झाले. त्यानंतर उपस्थित कर्मचाºयांनी यंत्रांची तपासणी केली. कर्मचाºयांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. त्यानंतर कर्मचारी, पोलिसांसह बसेस् व इतर वाहनांनी केंद्रांकडे रवाना होण्यास सुरुवात झाली.