लोकमत आॅन द व्हील्स : चुका सुधारण्यासाठी पुन्हा एक संधी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 01:01 PM2019-04-04T13:01:08+5:302019-04-04T13:01:36+5:30
धुळे ते दोंडाईचा 65 किमी
चंद्रकांत सोनार
धुळे : देश स्वतंत्र झाल्यापासून तब्बल ६० वर्षांपर्यत कॉग्रेस पक्षाची सत्ता देशात होती़ पक्ष जरी भष्ट्राचारी नसतो़ तरी पक्षातील मंत्र्यांनी स्वत:चाच आर्थिक फायदा करून घेतला़ त्यामुळे पक्षाला भ्रष्टाचाराचा कलंक लागला़ मतदारांनी मात्र विश्वास ठेवून आघाडी सरकारला ६० वर्ष दिलेली मते वाया गेलीत़
विद्यमान सरकारने कल्याणकारी निर्णय पाच वर्षात घेतले आहे़ काही निर्णय पूर्ण झालेले नसतील तर चुका सुधारण्यासाठी भारतीयांनी नव्याने संधी देण्याची गरज असल्याचे मत व्यापारी मनोज पोपली यांनी व्यक्त केले़
‘लोकमत प्रतिनिधी’ने धुळे ते दोंडाईचा दरम्यान केलेल्या प्रवासात बसमधील प्रवाशांचे मत जाणून घेतले.
काँग्रेसने ६० वर्षे देशाला फसवले, शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ यावे म्हणून भाजपाला मते दिलीत, मात्र तरी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव मिळाला नाही़ जो सत्तेवर येतो तो फक्त जनतेचा उपयोग करून घेतो़
काँग्रेसला नाकारले म्हणून त्याच मंत्र्यांना भाजपात प्रवेश घेऊन पवित्र केले, असे मत माजी सैनिक गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले़
शिक्षण, शेतकºयाची दुवा
धुळे-दोंडाईचा दीड तासाच्या प्रवासात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिकांनी राजकीय विषयावर मते व्यक्त केलीत़ यात काहींनी सरकारच्या कामांचे कौतुक केले तर काहींनी मात्र आरक्षण, हमीभाव, कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारवर टीका केली़
महाविद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी देश आरक्षण व भ्रष्टाचारमुक्त व्हावा, अशी अपेक्षा विद्यमान सरकारकडे असल्याचे सांगितले