लोकमत आॅन द व्हील्स : राष्ट्रीय सुरक्षेला महत्व देणाऱ्यांना संधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:09 PM2019-04-10T12:09:39+5:302019-04-10T12:10:08+5:30

जळगाव ते अमळनेर 56 किमी

Lokmat Anne The Wheels: The importance of national security as an opportunity! | लोकमत आॅन द व्हील्स : राष्ट्रीय सुरक्षेला महत्व देणाऱ्यांना संधी !

लोकमत आॅन द व्हील्स : राष्ट्रीय सुरक्षेला महत्व देणाऱ्यांना संधी !

Next

सागर दुबे
जळगाव : दहा वर्षांपूर्वी सर्वसामान्य माणूस हा रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरण्यास किंवा बाहेरगावाहून घरी यायला घाबरत होता़ मात्र, गेल्या काही वर्षात स्थिती बदलली असून मुंबई, दिल्ली, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये रात्री बेरात्री कोणतीही भिती न बाळगता सर्वसामान्य नागरीक फिरू शकतात़ एवढेच नव्हे तर आंतकवादी हल्ल्यांच्या घटनांमध्येही घट झाली आहे़ त्यामुळे भविष्यात देखील राष्ट्रीय सुरक्षेला महत्व देणाऱ्या पक्षालाच प्राधान्य देऊ असे मत जळगाव ते अमळनेर दरम्यानच्या केलेल्या प्रवासात बसमधील प्रवाशांनी व्यक्त केले़
‘लोकमत’ प्रतिनिधीने मंगळवारी जळगाव ते अमळनेर बसमध्ये प्रवास केला़ त्यावेळी प्रवाशांची मते जाणून घेतली़
अमळनेर येथे धान्याच्या कामानिमित्त जात असलेले नाशिक येथील योगेश कांतीलाल जैन यांनी सांगितले की, सरकारने जीएसटी आणल्याने काळाबाजार करणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे़ आणि जीएसटीमुळे व्यापाºयांना कुठलेही नुकसान झालेले नाही़ ते फायदेशिरच ठरले आहे़ लवकरच मतदान होईल, त्यात राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणाºया पक्षालाच मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले़ अरूण शेले यांनी सुध्दा स्थानिक मुद्द्यांना महत्व देणाºयांना संधी द्यावी असे मत व्यक्त करत जे ही सरकार आता येईल, त्या सरकारने निवडणुकीनंतर सरसकट शेतकºयांचे कर्ज माफ करावे ही अपेक्षा व्यक्त केली़
स्थानिक प्रश्न महत्वाचा
जळगाव-अमळनेर प्रवासात काही जेष्ठ नागरिकांशी चर्चा केली़ त्यावेळी पिंप्री येथील पांडुरंग पाटील यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक मुद्यांनाही महत्व आहे. स्थानिक गावांचा, शहरांचा विकास, युवकांना रोजगार तसेच शेतक ºयांची उन्नती या मुद्यांना महत्व देईल असेच सरकार आमच्यासाठी महत्वाचे आहे.
महाविद्यालयीन युवकांशी चर्चा केल्यानंतर अमळनेर येथील योगेश पाटील याने रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाºया आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबुत करणाºयांना मतदान करणार असल्याचे सांगितले़

Web Title: Lokmat Anne The Wheels: The importance of national security as an opportunity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव