लोकमत आॅन द व्हील्स : रोजगार व शिक्षणासाठी उपाययोजना व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:54 PM2019-04-03T12:54:14+5:302019-04-03T12:54:47+5:30
जळगाव ते यावल ५० किमी
जळगाव : लोकसभा निवडणुक सुरु झाली तशी राजकीय वातावरण तापले आहे. कट्यावरची चर्चा एस.टी.प्रवास, बाजार, भाजी मंडईत रंगत आहे. गरीब रथाच्या माध्यमातून प्रवाशाच्या अपेक्षा ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतल्यानंतर रोजगार व शिक्षणावर शासनाने भर देण्याची अपेक्षा व्यक्त झाली.
रावेर लोकसभा मतदार संघातील यावल-रावेर विधानसभा क्षेत्र हा केळीचा पट्टा मधून प्रसिद्ध आहे. काही वर्षांपासून दुष्काळीस्थिती असल्याने जलपातळीत घट झाली आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. रावेर भागातील केळीपट्टा वाचवायचा असल्यास मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सिमेलगत असलेल्या मेगा रिचार्ज प्रकल्पाला वेग देण्याची अपेक्षा बसमधील प्रवाशांनी व्यक्त केली.
गेल्या वर्षी झालेल्या वादळी पावसात केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र शासनाकडून अत्यल्प अनुदान आणि तेही मोठ्या विलंबाने देण्यात आले. शेतकरी टिकला तर देश टिकेल हे शासनाने ध्यानात घ्यावे. जो शेतकऱ्याचा विचार करेल तोच या देशावर राज्य करेल असा नारा बोदवड तालुक्यातील एका प्रवाशाने दिला.
प्रवाशांच्या मनात...
डॉ.उल्हास पाटील व भाजपाच्या रक्षा खडसे हे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षीत आहेत.
दोन्ही उमेदवारांना प्रश्नांची जाण आहे. राजकीय वारसा आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे.
रस्त्यांचे जाळे वाढविणे तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांत या शासनाने सुधारणा केली.
सरकार कोणतेही यावे मात्र तरुणांच्या हाताला रोजगार आणि गरीबाच्या भाकरीची व्यवस्था करणारे असावे.