‘लोकमत’ने घडवली गुरू-शिष्याची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 07:16 PM2020-05-02T19:16:03+5:302020-05-02T19:17:17+5:30

‘लोकमत’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरू संत सखाराम महाराज यांचे गादी पुरुष हभप प्रसाद महाराज व शिष्य मोहन बेलापूरकर महाराज यांची भेट घडवून अडीचशे वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे.

‘Lokmat’ created the Guru-Shishya meeting | ‘लोकमत’ने घडवली गुरू-शिष्याची भेट

‘लोकमत’ने घडवली गुरू-शिष्याची भेट

Next
ठळक मुद्दे संत सखाराम महाराज यात्रोत्सव सोशल मीडियातून प्रसाद महाराज व बेलापूरकर महाराजांची भेट

अमळनेर, जि.जळगाव : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेरच्या संत सखाराम महाराजांच्या यात्रेवर कोरोनामुळे विरजण पडले आहे. ‘लोकमत’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरू संत सखाराम महाराज यांचे गादी पुरुष हभप प्रसाद महाराज व शिष्य मोहन बेलापूरकर महाराज यांची भेट घडवून अडीचशे वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. दोन्ही संतांनी ‘लोकमत’चे आभार मानले.
वैशाख महिन्यात अमळनेरला बोरी नदीच्या वाळवंटात मोठा यात्रोत्सव साजरा होत असतो. एकादशीला रथोत्सव मिरवणूक होते. त्यावेळी राज्यातून दोन ते अडीच लाख भाविक अमळनेरात येत असतात. यंदा रथोत्सव ४ रोजी होणार होता. परंपरेप्रमाणे वैशाख मध्ये पांडुरंगाचे वास्तव्य अमळनेरला असते म्हणून संत सखाराम महाराजांचे शिष्य बेलापूरकर महाराज अमलनेरला येत असतात आणि गुरू शिष्याला वेशीवर जाऊन त्यांचे स्वागत करण्याची अडीचशे वर्षांची परंपरा आहे. ३ रोजी बेलापूरकर महाराज अमळनेर येणार होते. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने मोहन बेलापूरकर महाराज अमळनेर येऊ शकत नाहीत व अमळणेरचे वाडी संस्थान कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने प्रसाद महाराज बाहेर येऊ शकत नाही म्हणून ही परंपरा खंडित होण्याची भीती होती. गुरू शिष्याच्या भेटीचा हा सोहळा भक्त पाहू शकत नसले तरी ‘लोकमत’चे फोटोग्राफर महेंद्र पाटील आणि तालुका प्रतिनिधी संजय पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघं गुरू शिष्यांची भेट घडवून आणली. दोघा संतांनी परंपरा खंडित होऊ दिली नाही. म्हणून ‘लोकमत’चे आभार मानले आहेत आणि दोघांनी संपूर्ण महाराष्ट्र कोरोना मुक्त व्हावा, अशी प्रार्थना पांडुरंगाला केली आहे.
रथाच्या आदल्या दिवशी ३०० कि.मी. अंतरावरून मोहन बेलापूरकर महाराज वेशीवर आल्यानंतर गुरू प्रसाद महाराज त्यांचे आर.के.नगर भागात जाऊन स्वागत करतात. तेथून शिग्राममध्ये दोन्ही गुरू शिष्य यांना बसवून मिरवणूक काढली जाते. ठिकठिकाणी रांगोळी, पान सुपारीने स्वागत केले जाते. नंतर दिंडी तुळशी बागेत जाते. त्या दिवसापासून वाडी मंदिरात देवासमोर दररोज बेलापूरकर महाराज कीर्तन करीत असतात. संत सखाराम महाराजांची पुण्यतिथी साजरी करतात. द्वादशीला अम्बरशी टेकडीवर जात असतात व पालखीनंतर दुसºया दिवशी काल्याच्या किर्तनाने सांगता करतात.


यंदा मात्र मंदिरात दररोज भजन होणार आहे. ४ रोजी एकादशीला रथ मिरवणूक होणार नाही. रथ धुवून घेतला असून, लालजी व देवांची मूर्ती पूजा करून बाहेर काढून रथाभोवती प्रदक्षिणा घालून शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे.
-हभप प्रसाद महाराज, सखाराम महाराजांचे अकरावे गादी पुरुष,अमळनेर


पंढरपूर येथे संत सखाराम महाराजांच्या संस्थांमध्ये पुण्यतिथी साजरी करून आठ दिवस दररोज तेथेच कीर्तन होऊन काल्याच्या कीर्तनाने सांगता केली जाईल.
-मोहन महाराज बेलापूरकर (संत सखाराम महाराजांचे वारसदार शिष्य)

Web Title: ‘Lokmat’ created the Guru-Shishya meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.