Lokmat effect : हत्या,आत्महत्या प्रकरणात तात्काळ कारवाई करा ; महिला आयोगाने घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 06:20 PM2020-06-18T18:20:34+5:302020-06-18T18:21:09+5:30

बदलापूरातील प्रकरण

Lokmat effect | Lokmat effect : हत्या,आत्महत्या प्रकरणात तात्काळ कारवाई करा ; महिला आयोगाने घेतली दखल

Lokmat effect : हत्या,आत्महत्या प्रकरणात तात्काळ कारवाई करा ; महिला आयोगाने घेतली दखल

Next

बदलापूर/ जळगाव : बदलापूर येथील आठ वर्षीय मुलीचा हत्या व तिच्या आईची हत्या प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या अन्यायाची राज्य महिला आयोगाने स्वत:हून गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयोगाने ठाणे पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. ह्यलोकमतह्ण मध्ये प्रसिध्द झालेल्या बातमीची दखल घेऊन आयोगाने पोलीस अधीक्षकांकडे विचारणा केली आहे.
फ्लॅटसह विविध कारणांसाठी सतत पैशाची मागणी तसेच घटस्फोट घ्यावा यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून मीना अशोक पाटील या विवाहितेने आठ वर्षाच्या पोटच्या मुलीचा चाकूने गळा चिरुन स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे १० जून रोजी रात्री ११ वाजता घडली. दरम्यान, या घटनेला मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला पती व सासू जबाबदार असून त्यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा यासाठी मीना हिच्या वडीलांनी मंगळवारी ठाणे, अंबरनाथ व बदलापूर येथे पोलीस अधिकाऱ्यांकडे उंबरठे झिजवले, मात्र पोलिसांनी टोलवाटोलवी करुन मीना पाटील यांच्या वडीलांचा जबाब लिहून घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे टाळले. हा जबाबच महत्वाचा असून त्याआधारावर पुढील कारवाई करु असे सांगून नातेवाईकांची बोळवण केली.

तपासाधिकाºयांची भूमिकाच संशयास्पद
या प्रकरणाचे तपासाधिकारी उपनिरीक्षक हर्षल कुळकर्णी यांनी ह्यलोकमतह्ण ने विचारणा केली असता हे प्रकरण माझ्याचकडे आहे. मुलीच्या वडीलांना सर्व सविस्तर समजावून सांगण्यात आले आहे, आपण त्यांच्याकडूनच माहिती घ्यावी असे सांगितले तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी दिलेली आहे, मात्र आपण गुन्हा दाखल केला नाही या प्रश्नावर बोलणे मात्र त्यांनी टाळले. एकंदरीतच या प्रकरणात मीना पाटील हिचे पती अशोक पाटील पोलीस दलात असल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न बदलापूर पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप वडील दिलीप पाटील यांनी केला आहे.

काय म्हटले आहे महिला आयोगाने
राज्य महिला आयोगाच्या समुपदेशक सुनीता गणगे यांनी ठाणे पोलीस अधीक्षक यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, लोकमत या वृत्तपत्रात पोलीस असलेल्या पतीच्या जाचास कंटाळून मीना पाटील यांनी मुलीची हत्या करुन आत्महत्या केल्याची बातमी गुरुवारी प्रकाशित झाली आहे. याबाबत मुलीच्या वडीलांनी बदलापूर पोलिसात तक्रार दिली, मात्र पोलिसांकडून योग्य पध्दतीची दखल घेतली जात नाही. सदर प्रकरण गंभीर असून आयोगाने स्वाधिकाराने दखल घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तात्काळ योग्य ती कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल महिला आयोगास सादर करावा असे आदेश वजा पत्रात म्हटले आहे.
 

Web Title: Lokmat effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.