कासोद्यात लोकमत नातं रक्ताचं अभियान दोनदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:22+5:302021-07-16T04:13:22+5:30
लोकमत नातं रक्ताचं अभियानाला प्रतिसाद, कासोदा येथे ६० जणांनी केले रक्तदान कासोदा : लोकमत नातं रक्ताचं या ...
लोकमत नातं रक्ताचं अभियानाला प्रतिसाद, कासोदा येथे ६० जणांनी केले रक्तदान
कासोदा : लोकमत नातं रक्ताचं या अभियानात कासोदा येथे गुरुवारी राबविण्यात आलेल्या रक्तदान मोहिमेत ६० जणांनी रक्तदान केले. याआधी २ जुलै रोजी ५७ जणांनी रक्तदान केले होते. कासोदा गावात आता ११७ जणांनी, गावकऱ्यांनी सामाजिक उपक्रमात आपला भरीव सहभाग दिला आहे.
तालुक्यातील प्रहार पक्षाने गुरुवारच्या अभियानात मोठा सहभाग नोंदवला आहे, प्रहार व लोकमतने हे अभियान संयुक्तपणे राबविले आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंमतराव पाटील यांनी उपक्रमाचे उद्घाटन केले तर प्रहारचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी हे अध्यक्षस्थानी होते.
व्यासपीठावर जि.प.च्या माजी सदस्या महानंदा पाटील, डॉ. पी.जी. पिंगळे, माजी सरपंच संजय नवाल, भय्या राक्षे, राजाभाऊ पतसंस्थेचे चेअरमन पांडुरंग वाणी, रवींद्र चौधरी, संजय चौधरी, छबूलाल चौधरी, सुभाष चौधरी, सरिता मंत्री, भास्कर चौधरी, प्रवीण बाविस्कर, स्वप्निल बियाणी, नरेश ठाकरे, तसेच ओम स्टीलचे मिलिंद वारुळे व दिलीप उबाळे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी अनिल चौधरी, विजय भोसले, महानंदा पाटील व रवींद्र चौधरी, भास्कर चौधरी यांनी आपल्या मनोगतात लोकमतच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रेडक्रॉस रक्तपेढीचे डॉ. एस.बी. सोनवणे व त्यांच्या चमूने रक्तसंकलनाचे काम केले आहे. सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी केले, तर आभार लोकमतचे वार्ताहर प्रमोद पाटील यांनी मानले. यशस्वितेसाठी उमरे येथील प्रहारचे सुनील पाटील, शैलेश पांडे, सागर पाटील, मयूर पाटील, मधुकर ठाकूर, चंद्रभान पाटील, कैलास अग्रवाल, शितल मंत्री, सुनील झवर यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी : कासोदा येथे लोकमत नातं रक्ताचं या अभियानाचे दीपप्रज्वलन करून शुभारंभ करताना हिंमतराव पाटील, सोबत डावीकडून रवींद्र चौधरी, संजय आवटे, देवा महाजन, विजय भोसले, अनिल चौधरी, महानंदा पाटील व सरिता मंत्री आदी.
150721\img-20210715-wa0237.jpg
कासोदा-येथे रक्ताचा नातं हे अभियानाचा दि.१५रोजी दिपक प्रज्वलन करुन शुभारंभ करतांना जि.प.चे माजी उपाध्यक्ष हिंमतराव पाटील सोबत उजवीकडून रविंद्र चौधरी,देवा महाजन,अनिल चौधरी, महानंदा पाटील,सरिता मंत्री इत्यादी