‘लोकमत’ वृत्तपत्रसमूह खान्देशातही नंबर 1

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:55 AM2018-01-21T11:55:24+5:302018-01-21T12:02:16+5:30

विकासाचा ध्यास घेतलेले व विविध चळवळींमध्ये अग्रभागी राहिलेले वृत्तपत्र

'Lokmat' newsprint group number 1 | ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूह खान्देशातही नंबर 1

‘लोकमत’ वृत्तपत्रसमूह खान्देशातही नंबर 1

googlenewsNext
ठळक मुद्दे विविध क्षेत्रांच्या वार्ताकनात  ‘लोकमत’ नेहमीच आघाडीवर 2017च्या वाचक सव्रेक्षणाचे निष्कर्ष जाहीर

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 21- ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ ‘लोकमत’ ने खपाच्या बाबतीत प्रादेशिक वृत्तपत्रांत देशात द्वितीय, तर महाराष्ट्रात निर्विवादपणे प्रथम क्रमांक कायम ठेवला असतानाच कवयित्री बहिणाबाई, सानेगुरुजी, संत गुलाम महाराज, बालशहीद शिरीषकुमार यांची पावनभूमी असलेल्या खान्देशातही गौरवपूर्ण पहिला क्रमांक अबाधित ठेवला. ‘लोकमत’ची खान्देशातील वाचकसंख्या तब्बल 4.72 लाखांवर गेली आहे. 
इंडियन रिडरशिप सव्र्हे (आयआरएस) या नामांकित संस्थेने केलेल्या 2017च्या वाचक सव्रेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. त्यानुसार खान्देश व  महाराष्ट्र पादाक्रांत करणा-या ‘लोकमत’ची एकूण वाचकसंख्या तब्बल 1 कोटी 80 लाख 66 हजार झाली असून निकटच्या प्रतिस्पर्धी वृत्तपत्राच्या वाचकसंख्येपेक्षा ती कितीतरी अधिक आहे. खान्देशच्या कानाकोप:यात पोहोचलेला ‘लोकमत’ लोकांच्या जीवनाचा आविभाज्य भाग झाला आहे.
बातमी मग ती खान्देशची असो, महाराष्ट्राची असो, देशाची असो, विदेशाची असो की ब्रrांडाची असो, सर्वप्रथम आणि विश्वासार्हरीत्या देणार ‘लोकमत’च. याच विश्वासामुळे ‘लोकमत’ एकेक शिखर पादाक्रांत करीत आहे. 
खान्देशच्या विकासासाठी आक्रमक भूमिका, विविध चळवळींमध्ये अग्रक्रम, ऐतिहासिक वारशांची जपणूक, गुणवंतांचे कौतुक, संगीत-नाटय़-कला-सांस्कृतिक क्षेत्राची भरभराट याबरोबरच विविध क्षेत्रांच्या वार्ताकनात  ‘लोकमत’ नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. 

- लोकमत - 4,72,000

- पुण्यनगरी - 2,83,000

- दिव्य मराठी - 2,54,000
(आयआरएस सव्र्हे वाचक संख्या) 

सत्य न्यूज, त्यावरील व्ह्यूज, ताज्या घटना-घडामोडींवर परखड अग्रलेख व मते तसेच वाचनीय स्तंभ यामुळे ‘लोकमत’वर लोकांनी भरभरून प्रेम केले. त्याच जोरावर हा महत्त्वाचा टप्पा गाठता आला.    
- राजेंद्र दर्डा, एडिटर इन चीफ, लोकमत 

Web Title: 'Lokmat' newsprint group number 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.