लोकमत प्रॉपर्टी व ऑटो प्रदर्शनाचे जळगावात थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2017 10:34 AM2017-04-15T10:34:53+5:302017-04-15T10:34:53+5:30

‘लोकमत’ प्रॉपर्टी व ऑटो प्रदर्शनाचे शुक्रवारी रिंगरोडवरील यशोदया सभागृहात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन झाले.

Lokmat property and auto show inaugurated in Jalgaon | लोकमत प्रॉपर्टी व ऑटो प्रदर्शनाचे जळगावात थाटात उद्घाटन

लोकमत प्रॉपर्टी व ऑटो प्रदर्शनाचे जळगावात थाटात उद्घाटन

googlenewsNext

 जळगाव,दि.15- स्वत:चे घर व वाहनाचे स्वप्न साकार करण्याची संधी असलेल्या ‘लोकमत’ प्रॉपर्टी व ऑटो प्रदर्शनाचे शुक्रवारी रिंगरोडवरील यशोदया सभागृहात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

जळगावात स्वत:चे घर असण्यासह गाडीचेही स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी घर व वाहन यांची माहिती व खरेदीची सोय एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक व ऑटो व्यावसायिकांचा समावेश आहे.  या तीन दिवसीय प्रदर्शनाचे शुक्रवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते थाटात उद्घाटन झाले. या वेळी आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, ‘क्रेडाई’चे अध्यक्ष अनिश शहा, आदित्य बिल्डर्सचे संचालक सुमित मुथा, मानराज मोर्टर्सचे महाव्यवस्थापक अशोक बेदमुथा, ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्‍जवालन करण्यात आले व फीत सोडून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. 
मिलिंद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रास्ताविक उपव्यवस्थापक (जाहिरात) राहुल भिंगारदिवे यांनी केले. 
या उद््घाटन सोहळ्यास श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक समर्थ खटोड, क्रेडाईचे सचिव सागर ताडे, ब्लॅक कॅट इन्फ्रा प्रोजेक्टस् प्रा. लि. ईश्वर मोरे, जळगाव जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनास ओरिएंट सिमेंटचे व्हाईस प्रेसिडेंट पवन जग्गी, उप महाव्यवस्थापक बिंदेश भोळे, हातीम अन्वरअली आदींनी भेट दिली. सूत्रसंचालन लोकमतच्या उपव्यवस्थापक (एलएमएस) भावना शर्मा यांनी केले. 
पोषक वातावरण तयार करण्यासाठी मदत 
‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक करीत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर म्हणाले, जळगावाच्या विकासासाठी प्रशासनाचे सहकार्य राहणार आहे. बांधकाम व्यावसायिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासह कायद्याच्याबाबतीतही अडचणी दूर करण्यात येतील.
शहराची भरभराट होईल
अनिश शहा यांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे स्वागत केले. जळगावात खूप संधी आहे. बांधकाम व्यवसायासह सर्वच क्षेत्रात भरभराट होऊन शहराचीही भरभराट होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला. 
बांधकाम व्यावसायिकांना सहकार्य करू
नितीन लढ्ढा म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेकडून काही अडचणी येत असतील तर त्यावर चर्चा करून मार्ग काढण्यात येईल व सहकार्य करण्यात येईल. 

Web Title: Lokmat property and auto show inaugurated in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.