लोकमत रक्ताचं नातं महायज्ञाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:31+5:302021-07-07T04:19:31+5:30
महिलांसह तरुणांचा सहभाग चाळीसगाव : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महाभियानाचा ...
महिलांसह तरुणांचा सहभाग
चाळीसगाव : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महाभियानाचा मान्यवरांच्या हस्ते सोमवारी सकाळी बापजी रुग्णालयात उत्साहात प्रारंभ झाला. विशेषतः महिलांसह तरुणांनी यात सहभाग नोंदविला.
नगराध्यक्षा आशालता चव्हाण, किसान ज्ञानोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. उत्तमराव महाजन, सम्राट अशोक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोक खलाणे, उमंग महिला समाजशिल्पी अध्यक्षा संपदा उन्मेश पाटील, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण, डॉ. संदीप देशमुख, राशिप्रमं संचालक विश्वास चव्हाण, अनिता शर्मा, योजना धनंजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत संजय सोनार, रवींद्र वरखेडे, श्रीकांत भामरे, दिलीप सोनवणे यांनी ‘स्वामी विवेकानंद यांचे विचार’ हे पुस्तक देऊन केले. सूत्रसंचालन जिजाबराव वाघ यांनी केले. कार्यक्रमात १३२ वेळा रक्तदान करणारे प्रा. दीपक शुक्ल, पंकज देसले, योगेश राजधर पाटील, खुशाल पाटील, रमेश चौधरी, अर्जुन परदेशी, चेतन निंबा चव्हाण, नाना अहिरे, माधवराव मगर, आदी उपस्थित होते. शिबिरात ३० जणांनी रक्तदान केले. त्यात प्रामुख्याने सहायक पोलीस निरीक्षक पवन देसले, वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश सदागिरे, राकेश बोरसे, सायली अहिरे यांचा समावेश आहे.
जीवन सुरभी ब्लड बँकेकडून रक्त संकलन करण्यात आले. यासाठी डॉ. दत्ता भदाणे, प्रवीण पाटील, तेजस बोडखे, वैशाली सोनवणे यांनी
मदत केली. या शिबिरात नगरसेवक रामचंद्र जाधव, स्वयंदीप संस्थेच्या अध्यक्ष मीनाक्षी निकम, अपंग संस्थेच्या सचिव भारती चौधरी, सुचित्रा पाटील यांनी भेट दिली. यासाठी बापजी रुग्णालय व लाईफ सेव्हर्स ग्रुपचे सहकार्य लाभले.
प्रतिभा चव्हाण यांनी पहिल्यांदाच केले रक्तदान-
आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांनी स्वतः पहिल्यांदाच रक्तदान करून या मोहिमेत सहभाग नोंदविला.
फोटो ओळी
चाळीसगाव येथे रक्तदान शिबिरात प्रतिमा पूजनप्रसंगी नगराध्यक्षा आशालता चव्हाण व डॉ. उत्तमराव महाजन. सोबत उजवीकडून प्रतिभा चव्हाण, संपदा पाटील, आरती शर्मा, योजना पाटील तर डावीकडून अशोक खलाणे, विश्वास चव्हाण, डॉ. संदीप देशमुख.