लोकमत रक्ताचे नाते महायज्ञाला जळगाव, ममुराबादमध्ये प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:11+5:302021-07-05T04:12:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव / ममुराबाद : ‘लोकमत'चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भव्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव / ममुराबाद : ‘लोकमत'चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी जळगाव शहरात तसेच ममुराबाद येथे रक्तदान शिबिर पार पडले. जळगाव शहरात हर्षीत पिपरीया यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पिपरीया परिवार, ज्ञान योग वर्ग आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. या दोन्ही शिबिरात ७८ बॅग रक्त संकलन झाले आहे. दरम्यान, शहरातील काही खेळाडूंनीही रेडक्रॉस रक्तपेढीत रक्तदान करून या चळवळीत योगदान दिले.
शहरातील शिबिरात जनजागृतीही
शहरातील विसनजीनगरात स्व. हर्षित पिपरीया यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, ललीत चौधरी, रेडक्रॉस रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, मानद सचिव विनोद बियाणी, हेतल पिपरिया, दीपककुमार गुप्ता, धरीत व्यास, राजेंद्र पिपरीया, राज पटेल, भूमी पिपरीया, सोनल मेहता, जीनल जोशी, प्रकटेश व्यास, विराग मेहता, दक्ष दोषी, मुकेश निंबाळकर, ज्ञान पिपरीया, डॉ. विशाल पिपरीया, शुभम सानप, गणेश सानप, जितेंद्र जाधव, राजू कामदार, आदींची उपस्थिती होती. विसनजी नगर मित्र मंडळ, तसेच श्री साई नर्मदे फाउंडेशनचे सहकार्य मिळाले. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर सुरू होते. या ठिकाणी प्रत्येक रक्तदात्याला एक भेटवस्तू तसेच रोपे वाटप करण्यात आली. या ठिकाणी रक्तदानाच्या जनजागृतीची पोस्टर्स लावण्यात आली होती. तसेच सेल्फी पॉइंटही ठेवण्यात आला होता. कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतल्याचे आयोजक हेतल पिपरीया यांनी सांगितले.
ममुराबाद येथे प्रतिसाद
ममुराबाद तसेच परिसरातील नागरिकांना रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देऊन गावातील तरुण व नागरिकांनी रक्तदान केले. जळगाव येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. ए. एम. चौधरी तसेच तंत्रज्ञ किरण बाविस्कर, संदीप वाणी, दीक्षा पाटील, चालक अन्वर यांनी रक्तसंकलन केले. जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांना प्रशस्तिपत्राचे वाटप झाले. यावेळी ममुराबादचे माजी सरपंच महेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य शैलेश पाटील, गोपालकृष्ण मोरे, अनिस पटेल, विलास सोनवणे तसेच नासिर पटेल, सुनील चौधरी, अजय चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश पाटील, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष दत्तू सोनवणे, ज्ञानेश्वर सावळे, पप्पू मिश्रा, गोरख सोनवणे, नितीन पाटील, आदी उपस्थित होते.
----------------
तरुणाचे २३ वेळा रक्तदान
जळगाव शहरातील रहिवासी नयन भास्कर राणे या २३ वर्षीय बॉक्सिंग खेळाडूने २०१८ पासून २३ वेळा रक्तदान केले असून, लोकमत रक्ताचे नाते अभियानातही त्याने पुढाकार घेत रविवारी रेड क्रॉस सोसायटी येथे रक्तदान केले. रक्तदान केल्याने तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होऊन तुमची प्रतिकारक्षमता वाढते. सर्वांनी रक्तदान करावे, शिवाय यामुळे तुम्ही दुसऱ्यांचा जीव वाचवू शकता. तेव्हा गैरसमज दूर ठेवून रक्तदानाला पुढे या, असे आवाहनही नयन याने केले आहे.