लोकमत रिअॅलिटी चेक : आदेश धाब्यावर बसवून खासगी रुग्णालयांकडून शुल्क आकारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:04 PM2020-08-10T12:04:31+5:302020-08-10T12:04:45+5:30
कोविड उपचार : प्रत्येक रुग्णालयात वेगळे दर, रुग्णालये शासनाच्या नियंत्रणाबाहेरच
आनंद सुरवाडे ।
जळगाव : कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देऊन त्यांची दर निश्चिती शासनाने केली असून याबाबत २१ मे रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर सूचनाही जारी केल्या आहेत़ मात्र, या सूचना व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसून खासगी रुग्णालयांकडून शुल्क आकारले जात असून हे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिअॅलिटी चेक’ मध्ये समोर आले आहे़
दोन रुग्णालयांची बिले
‘लोकमत’ कडे दोन रुग्णालयाची बिले आली आहेत़ एका रुग्णालयाने तर चक्क कागदावरच लिहून दिले आहे़ यानुसार साधारण कक्षाचे एका रुग्णालयाने ८ हजार रूपये प्रति दिवस शुल्क आकारले आहे तर दुसºया रुग्णालयाने दहा हजार आकारले आहे़ यात या रुग्णालयांनी नोंदणी म्हणून प्रत्येकी हजार रुपये आकारले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश
देयकांच्या लेखापरिक्षणासाठी अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यानुसार ४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश पारित केले आहे़ त्यानुसार आरोग्य विभागाच्या अधिसूचनेनुसार रुग्णालयाच्या एकूण बेडपैकी ८० टक्के बेड कोविडचे असतील़ त्यासाठी शासनाने ठरवून दिलेले दर असतील़ पथकांनी कोविड, नॉन कोविड रुग्णांकडून आकारण्यात येणाºया देयकांचे स्वतंत्र पद्धतीने तक्रारीनुसार लेखापरीक्षण करावे़ दर दिवशी डिस्चार्ज होणाºया दहा टक्के रुग्णांच्या देयकांचे लेखापरीक्षण करण्यात यावे.
साहित्याची वेगळी आकारणी
पीपीई किटसारखे साहित्य जे एकापेक्षा अधिक रुग्णांना एकच वापरावे लागत असतील तर त्यांची फी ही विभागून घ्यावी, असे शासनाच्या आदेशात स्पष्ट म्हटल असताना नुकतेच एका खासगी रुग्णालयाने २ हजार रूपये प्रति किट या प्रमाणे २० किटचे ४० हजार रुपये एका रुग्णाकडून आकारले़ याबाबत तक्रारही करण्यात आली होती़ एका खासगी रुग्णालयात विचारणा केली असता पीपीई किटचे वेगळे चार्जेस द्यावेच लागतील असे सांगण्यात आले़
दोन रुग्णालये वगळली
जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील १२ रुग्णालयांना अशा उपचारांना परवानगी दिलेली आहे. यात जळगाव शहरातील सात, अमळनेर चार आणि पाचोरा येथील एका रुग्णालयाा समावेश आहे.
४ आॅगस्ट रोजी काढलेल्या आदेशात या रुग्णालयांचा उल्लेख आहे़ मात्र, यातील दोन रुग्णालयाशी संपर्क साधला असता आमचे रुग्णालय हे आता नॉन कोविड असून कोविड मधून वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे जिल्हयात दहाच रु ग्णालयांमध्ये कोविडसाठी उपचार होत आहेत. ही दो़न्ही रुग्णालये जळगाव शहरातील आहे.