लग्नासाठी आलेल्या अमळनेरच्या वृध्देला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 11:06 PM2018-04-23T23:06:23+5:302018-04-23T23:06:23+5:30

मारहाण करुन लुटल्यानंतर परत जाण्यासाठी भाड्याला दिले २० रुपये

Looted Amalner's Grade for the wedding | लग्नासाठी आलेल्या अमळनेरच्या वृध्देला लुटले

लग्नासाठी आलेल्या अमळनेरच्या वृध्देला लुटले

Next
ठळक मुद्देलुटल्यानंतर रिक्षा भाड्याला दिले २० रुपयेएमआयडीसी पोलीस स्टेशनला जबरी लुटीचा गुन्हा दाखलरिक्षा चालकाने चाकूचा धाक दाखवून लुटले ६८ हजाराचे दागिने

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२३ : अमळनेर येथून भाचीच्या लग्नासाठी जळगावात आलेल्या लिलावती विनायकराव सोनवणे (वय ६५,रा.बालाजीपुरा, अमळनेर) या वृध्देला रिक्षा चालकाने चाकूचा धाक दाखवून ६८ हजाराचे दागिने लुटून नेल्याची घटना रविवारी रात्री साडे नऊ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सोमवारी जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिलावती सोनवणे यांचे भाऊ सुनील डिंगबर पाटील हे शहरातील रामपेठेत राहतात. त्यांच्या मुलीचे २४ एप्रिल रोजी लग्न असल्याने लिलावती सोनवणे या अमळनेर येथून साडे सात वाजता जळगावला येण्यासाठी निघाल्या.
बसस्थानकावर रात्री ९.१५ वाजता उतरल्यानंतर त्या चालतच पांडे चौकाकडून घरी जात असताना पेट्रोल पंपाजवळ एक मजबूत शरीरयष्टी व गोऱ्या रंगाचा रिक्षावाला त्यांच्याजवळ आला.
आजी रिक्षात बसा, मी तुम्हाला घरी सोडून देतो असे सांगून रिक्षात बसण्यासाठी आग्रह करीत होता. घर जवळच असल्याने मी चालत जाते असे सांगून लिलाबाई यांनी रिक्षात बसण्यास नकार दिला असता त्याने कमी पैसे द्या, मी तुम्हाला सोडतो असे सांगून रिक्षात बसविले.
लुटल्यानंतर रिक्षा चालकाने त्यांना रस्त्यावर आणून सोडले व रिक्षाने जाण्यासाठी भाड्यापोटी २० रुपये त्यांना दिले. त्यानंतर हा रिक्षा चालक निघून गेला. लिलाबाई तेथून दुसºया रिक्षाने नेरी नाका चौकात आल्या. तेथून भावाकडे गेल्या. भाऊ व भावजयी त्यांना घडलेली हकीकत सांगितली. रात्र झाल्यामुळे पोलिसात जाणे टाळले. सोमवारी सकाळी ज्या ठिकाणाहून रिक्षा चालकाने बसविले तेथे जावून पाहणी केली व त्यानंतर दुपारी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

Web Title: Looted Amalner's Grade for the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.