बलात्काराची धमकी देत जळगावात दाम्पत्याला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2017 11:13 AM2017-06-24T11:13:45+5:302017-06-24T11:13:45+5:30
रायसोनी नगरातील थरारक घटना.सुरक्षारक्षकाला मारहाण करून धारधार शस्त्राचा दाखविला धाक
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.24 -पोलीस असल्याचे सांगत तोंडाला रूमाल बांधून आलेले दोन चोरटे बंगल्यात शिरल़े तेथील सुरक्षा रक्षकाला मारहाण करीत व धारदार शस्त्राचा धाक दाखवित व मुलीवर बलात्काराची धमकी देत मंगळसूत्र व पैसे घेऊन चोरटय़ांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास रायसोनीनगरात घडली. महिलेने आरडाओरड केल्याने हा प्रकार उघडकीस आला व चोरटे पसार झाल़े
शिवसेना महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा मंगला बारी यांचा रायसोनी नगरात गट नं.458, प्लॉट नं 36 येथे बंगला आह़ेया बंगल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून फर्निचरचे काम सुरू आह़े बांधकाम सुरू असल्यापासून बारी यांनी याठिकाणी मध्यप्रदेश येथील रोहीदास जाधव हा सुरक्षारक्षक ठेवला आह़े त्याला राहण्यासाठी बंगल्याच्या तळमजल्यावर खोली आह़े खाजगी कामानिमित्ताने सात ते आठ दिवसांपासून जाधव गावाकडे गेलेले आहेत़
गावाकडे गेलेले जाधव यांचा अपघात झाल्याने त्यांनी त्याच्या जागी त्यांचा शालक भिमा बुधा राठोड यांना सुरक्षारक्षक म्हणून जळगावला पाठविल़े भिमा राठोड हे पत्नी सविता व दोन मुलांसोबत चार ते पाच दिवसांपूर्वीच जळगावात आल़े
140 रुपयेही हिसकावले
शुक्रवारी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास राठोड दाम्पत्याला लुटले. चोरटय़ांच्या हातात मंगळसूत्र पडताच त्यांनी पैशांची मागणी केली़ भिमा राठोड यांनी त्यांच्या खिशातील शंभर रुपये तर त्यांच्या पत्नी सविता यांनी त्यांच्याकडील चाळीस रुपये घेतल़े
महिला आरडाओरड करत बंगल्याबाहेर पळाली
सविता राठोड यांनी दोघांपैकी एकाकडे बंगल्याच्या चाव्या देत आरडाओरड केली व जवळच बांधकाम ठिकाणी सुरक्षारक्षक असलेल्या नातेवाईक अजमल राठोड व सदाशिव राठोड यांच्याकडे पळत सुटल्या़ राठोड यांचे नातेवाईक व बंगल्यासमोरील रहिवासी पंकज भावसार हे बारी यांच्या बंगल्याजवळ जमल़े भावसार यांनी कन्हैया बारी यांना मोबाईलवर संपर्क साधला़ मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही़ अखेर भावसार यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फोन केला व मारहाण करून लुटल्याची माहिती दिली.