जळगाव रेल्वे स्थानक रस्त्यावर वाहनधारकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 02:33 PM2018-05-26T14:33:38+5:302018-05-26T14:33:38+5:30
खान्देश सेंट्रल मॉलकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाºया रस्त्यावर रेल्वेस्टेशन नजीक पार्कींग केल्यास अनधिकृतपणे पार्र्कींगचे पैसे बळजबरीने वसुलीचा प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२६ : खान्देश सेंट्रल मॉलकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाºया रस्त्यावर रेल्वेस्टेशन नजीक पार्कींग केल्यास अनधिकृतपणे पार्र्कींगचे पैसे बळजबरीने वसुलीचा प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा प्रकार नेहमीचाच असल्याच्या तक्रारी आहेत. गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमरास हाच अनुभव अॅड. सुशील अत्रे यांना आला. एवढेच नाही तर पैसे वसुलीसाठी त्यांना दमदाटीही झाली.
जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी गेल्या वर्षी गोविंदा रिक्षा स्टॉपपासून ते थेट रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी हा रस्ता तयार केला आहे.
हा रस्ता सार्वजनिक वापरासाठी सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. या रस्त्याशेजारीच रेल्वे स्थानकाच्या भिंतीलगत मोकळ्या जागेवर रेल्वे प्रवाशांसाठी पार्किंगची स्वतंत्र सुविधा भाडे तत्वावर उपलब्ध केली आहे.
दरम्यान, हा रस्ता सोयीचा तयार झाल्यामुळे अनेक प्रवासी या रस्त्यानेच आपल्या नातलगांना सोडण्यासाठी येत असतात. दोन मिनिटाचे काम असल्याने या मार्गावर रेल्वेस्टेशन जवळच रस्त्यालगतच प्रवासी उतरेपर्यंत गाडी उभी करीत असतात.
प्रवाशांना सोडल्यानंतर लगेच परत जातात. असे असतानाही वाहनतळाच्या ठेकेदाराच्या कर्मचाºयांकडून प्रवाशांकडुन रस्त्यालगत उभे करण्याचेही पैसे मागितले जातात.
मॉलच्या पार्कीग झोन मध्ये पार्कीग केलेली नसताना रस्त्यालगत वाहन दोन मिनीट जरी उभे केले तरी तेथील कर्मचारी प्रवाशांकडुन दमदाटी करित बेकायदेशिरपणे पैसे मागण्याचे प्रकार सुरु आहेत.
एखाद्या प्रवाशाने विरोध केल्यावर शिवीगाळदेखील केल्या जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
या प्रकारामुळे, प्रवाशांकडुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पार्किंगच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडुन केली जात आहे.