ढोल ताशांच्या गजरात निघणार भगवान श्री परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 08:18 PM2019-05-04T20:18:43+5:302019-05-04T20:21:05+5:30
आज मोटारसायकल रॅली
जळगाव- भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त ‘जय परशुराम’च्या जयघोषासह ढोल-ताशांच्या गजरात मंगळवारी सायंकाळी ५ वाजता रथ चौकातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून यामध्ये सहा ते सात हजार समाज बांधवांचा समावेश राहणार असल्याची माहिती बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़ याप्रसंगी विश्वनाथ जोशी, लेखराज उपाध्याय, अशोक वाघ, मंगला पाठक, स्वाती कुळकर्णी, संजय कुळकर्णी आदींची उपस्थिती होती़
मंगळवारी भगवान श्री परशुराम जयंती साजरी करण्यात येणार आहे़ तत्पूर्वी रविवारी महाबळ येथील छत्रपती संभाजी महाराज चौकातून सकाळी ९ वाजता भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असून यामध्ये फेटेधारी महिलांसह समाज बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग असणार आहे़ हिरवी झेंडी दाखवून प्रांरभ झालेल्या या रॅलीचा समारोप ब्राह्मण सभा येथे होईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
ठिकठिकाणी भगवान श्री परशुराम पूजन
श्री परशुराम जयंतीनिमित्त मंगळवारी शहरातील विविध ठिकाणी भगवान परशुराम यांच्या पूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे़ सकाळी ९ वाजता गणेश कॉलनी, महाबळ चौक, शिवाजी नगर, मुक्ताईनगर, अयोध्यानगर, बालाजीपेठ, शनिपेठ, भूषण कॉलनी आदी ठिकाणी हे पूजन होईल़
महिला सादर करणार चित्तथरारक प्रात्यक्षिके
मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रथ चौकातून शोभायात्रेला सुरूवात होईल़ शोभायात्रामध्ये शूरवीर नायक श्रीमंत बाजीराव पेशवा व राणी लक्ष्मीबाई या दोन महिला व तरूणींचे ढोलपथकाचे विशेष आकर्षण असणार आहे़ या दोन्ही पथकांमध्ये प्रत्येकी ७५ ढोल व १५ ताशे असतील़ विशेष म्हणजे, यंदाही महिला तलवार व दानपट्टयाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करणार आहेत़ लेझीम पथकाचेही सादरीकरण होईल़
चिमुकले साकारणार संतांची वेशभुषा
शोभायात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने समाज बांधव पारंपारिक वेशभुषत सहभागी होतील़ समाजातील अनेक महापुरूष व संतांची वेशभुषा साकारलेले चित्ररथ देखील शोभायात्रेत असणार असून यामध्ये चिमुकले संतांची वेशभुषा साकारतील़ भगवान परशुरामांचा नवीन भव्य व आकर्षक रथ हे यंदाचे विशेष आकर्षण असणार आहे़ तसेच ठिकठिकाणी थंड पाणी व सरबताची सुविधा बहुभाषिक ब्राह्मण संघाकडून करण्यात आली असल्याचेही खटोड यांनी सांगितले़
असा असणार शोभायात्रेचा मार्ग
७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता शोभायात्रेला रथचोकातून प्रांरभ होईल़ नंतर सराफ बाजार, सुभाष चौक, दाणा बाजार, सारस्वत चौकमार्गे बालगंधर्व नाट्यगृह येथे शोभायात्रेचा समारोप होईल़ त्यानंतर रात्री ८ वाजता दाणाबाजार येथील अन्नदाता हनुमान चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती होईल़ व त्यानंतर बालगंधर्व नाट्यगृह येथे महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडेल,असेही खटोड यांनी सांगितले़ यावेळी मोहन तिवारी, किसन अबोटी, केदार जोशी, पंकज पवनीकर, पियूष रावळ आदींची उपस्थिती होती़
हे घेत आहेत परिश्रम
जन्मोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, लेखराज उपाध्याय, सुरेंद्रनाथ मिश्रा, विश्वनाथ जोशी, अशोक वाघ, मोहन तिवारी, संजय कुळकर्णी, राजेश नाईक, सौरब चौबे, पियुष रावळ, अजित नांदेडकर, शिव शर्मा, केदार जोशी, किसन अबोटी, नीलेश राव, विशाल शर्मा, प्रकाश शर्मा, राधेश्याम व्यास, गोविंद ओझा, किरण दायमा, अजय डोहोळे, दिलीप सिखवाल, राजेंद्र कुळकर्णी, सुरेश शर्मा, महावीर पंचारिया, आनंद तिवारी, नंदकिशोर उपाध्याय, संजय शुक्ला, श्याम नागला, महेश दायमा, महेंद्र पुरोहित, गोपाळ पंडित आदींनी परिश्रम घेत आहेत़