भडगाव तालुक्यासाठी फळबाग नुकसानीसाठी १ लाख ५० हजारांची मदत मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 03:19 PM2019-06-19T15:19:53+5:302019-06-19T15:21:59+5:30

भडगाव तालुक्यातील फळबागांचे नुकसानीबाबत शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी, या मागणीचे निवेदन भडगाव पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे.

For the loss of orchards for Bhadgaon taluka, 1 lakh 50 thousand help | भडगाव तालुक्यासाठी फळबाग नुकसानीसाठी १ लाख ५० हजारांची मदत मिळावी

भडगाव तालुक्यासाठी फळबाग नुकसानीसाठी १ लाख ५० हजारांची मदत मिळावी

googlenewsNext
ठळक मुद्देआमदार किशोर पाटील यांचे मुख्यमंंत्र्यांना निवेदनगारपिटीने केळी व इतर पिकांच्या फळबागा अवघ्या ३० मिनिटात नेस्तनाबूत

भडगाव, जि.जळगाव : तालुक्यातील फळबागांचे नुकसानीबाबत शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी, या मागणीचे निवेदन भडगाव पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे.
मुख्यमंंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ११ जून रोजी प्रचंड वारा व गारपिटीने भडगाव तालुक्यातील वडजी, पांढरद, पिचर्डे, बात्सर, कनाशी, बोरनार, बोदर्डे, निंभोरा आदी गावातील केळी व इतर पिकांच्या फळबागा अवघ्या ३० मिनिटात नेस्तनाबूत झाल्या. फळबागांच्या नुकसानीबाबत संबंधित अधिकारी, कर्मचारी पंचनामे तातडीने करीत आहेत. जवळपास ३५० हेक्टरी जमिनीवरील फळबागा जमिनदोस्त झाल्या आहेत. फळबागांचे उत्पन्न पदरात पडेपर्यंत बळीराजाचे हेक्टरी १ लाख ५० हजार रुपयांचा खर्च झालेला असतो. मात्र शासन धोरणानुसार जी मदत निधी दिला जातो तो फक्त हेक्टरी १३ हजार ५०० रुपये एवढाच असतो. मात्र खर्च पाहता शासनाची ही मदत तोकडी आहे. शेजारील मध्य प्रदेश राज्यात केळीसाठी हेक्टरी १ लाख रुपसांची मदत दिली जाते. मग राज्यातील शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत का, असा प्रश्न शेतकºयांकडून विचारला जात आहे. तरी शासनाने हेक्टरी १ लाख ५० हजार रुपयांची मदत निधी देण्यास विशेष निधीची तरतूद करावी. तातडीने संबंधित अधिकाºयांना आदेश द्यावा, असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर आमदार किशोर पाटील यांची सही आहे.
 

Web Title: For the loss of orchards for Bhadgaon taluka, 1 lakh 50 thousand help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.