लाखो लोकांना पुरेल इतके पाणी रोज जाते वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 11:22 AM2019-01-10T11:22:29+5:302019-01-10T11:23:04+5:30

वाघूर धरणाकडून येणाऱ्या पाईपलाईनमध्ये सहा ठिकाणी लिकेज

Lots of water can be consumed every day by millions of people | लाखो लोकांना पुरेल इतके पाणी रोज जाते वाया

लाखो लोकांना पुरेल इतके पाणी रोज जाते वाया

Next
ठळक मुद्देमनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

जळगाव : शहराला वाघूर धरणातून पाणी पुरवठा होत असून, यंदा दुष्काळाची स्थिती असल्याने वाघूर धरणात काही महिने पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ नये म्हणून मनपाकडून तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन सुरु आहे. मात्र, दुसरीकडे वाघूर धरणातून शहराकडे येणाºया पाईप-लाईनीत सहा ठिकाणी मोठी गळती असल्याने सुमारे सव्वालाख लोकवस्तीला पुरेल इतका पाणीसाठा दररोज वाया जात असल्याचे ‘लोकमत’ च्या पाहणीत आढळून आले आहे.
यंदा जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या पाच टक्के कमी म्हणजेच ६७.४ टक्के इतकेच पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे जळगावला पाणी पुरवठा करणाºया वाघूर धरणात यंदा सप्टेंबर अखेर ४८ टक्केच जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे उन्हाळ्यात जळगावकरांवर पाणी संकट निर्माण होईल अशी भिती सप्टेंबर महिन्यापासूनच वर्तविली जात असताना, मनपा प्रशासनाकडून त्या संदर्भातील नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, मनपाकडून कोणतेही नियोजन अद्याप देखील करण्यात आलेले नाही. ‘लोकमत’ ने बुधवारी वाघूर धरणातून जळगावकडे येणाºया मुख्य पाईपलाईनची पाहणी केली असता सहा ठिकाणी मोठे लिकेज आढळून आले.
रायपुरजवळ वाहतेय धो धो पाणी
वाघूर धरणातून येणाºया पाईनलाईनच्या मार्गात रायपूर गावातील एका व्हॉल्व्हच्या ठिकाणी सुमारे पंधरा दिवसांपासून लिकेज आहे. या ठिकाणी पाण्याचा दाब जास्त दिसून आला. या ठिकाणी दिवस-रात्र पाण्याची नासाडी सुरुच आहे.
गळती होणाºया पाण्याचा उपयोग येथील ग्रामस्थांनादेखील होत नसल्याने संपूर्ण पाणी वायाच जात आहे. या ठिकाणच्या ग्रामस्थांनी वाघूर धरणावरील काही अभियंत्यांकडे या व्हॉल्व्हच्या लिकेजची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, किरकोळ दुरुस्तीनंतर अभियंत्यांनी याठिकाणी दुर्लक्षच केले आहे.
कंडारी गावात साचले डबके
कंडारी गावात देखील पाईपलाईनमध्ये लिकेज असून हा लिकेज देखील महिनाभरापासून असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.
दरम्यान, ‘लोकमत’ च्या पाहणी दरम्यान पाण्याचा दाब कमी असल्याने कंडारी गावातील लिकेजच्या ठिकाणी निघणाºया पाण्याचा फ्लो कमी होता. मात्र, आजुबाजू साचलेल्या पाण्याचा डबक्यावरून वाया जाणाºया पाण्याचा अंदाज लावला येतो. लिकेज होणाºया पाण्याचा वापर येथील ग्रामस्थ करत असल्याची माहितीही नागरिकांनी दिली आहे. यासह या गावाच्या ठिकाणी लहान-मोठे लिकेज आढळून आले.
या संदर्भात पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता डी.एस.खडके यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
दरम्यान, गुरुवारी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे हे वाघुर धरणाला भेट देणार असून तेथेच नियोजनाबाबत बैठक होणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली.
मेहरूण भागात तीन ठिकाणी लिकेज
1 मेहरुण भागात असलेल्या पाईपलाईनची पाहणी केली असता तीन ठिकाणी लिकेज असल्याचे आढळून आले. गोसावी महाल जवळ एक लिकेज आढळून आला या ठिकाणावरून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. यासह मेहरुण भागातील बुरूजच्या ठिकाणीही मोठा लिकेज असल्याने पाण्याची प्रचंड नासाडी होत होती. मेहरुण भागातील शिवाजी उद्यानाजवळ देखील अनेक महिन्यांपासून मोठा लिकेज असल्याने हजारो लिटर पाणी या ठिकाणी वाया जात होते. याबाबत मंगळवारी झालेल्या महासभेत मुद्दा गाजल्यानंतर बुधवारी मनपाकडून या ठिकाणच्या लिकेजची दुरुस्ती सुरु असल्याचे दिसून आले. उशीरा का होईना मनपाला जाग आलेली पहायला मिळाली.
शहरात अनेक ठिकाणी गळत्या कायम
2 ‘लोकमत’ ने केवळ वाघूर धरणाकडून येणाºया मुख्य पाईप-लाईनचीच पाहणी केली. मात्र, शहरातील प्रत्येक प्रभागात अनेक ठिकाणी लहान-मोठ्या गळत्या या अनेक महिन्यांपासून कायम आहेत. त्यातून देखील हजारो लिटर पाणी वाया जात आहे. दुष्काळाची परिस्थिती पाण्याचा एक-एक थेंब वाचवण्याची गरज असताना मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
अनेक भागांमध्ये पाणी टंचाई
3 एकीकडे मनपाच्या भोंगळ कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असताना सुप्रीम कॉलनी, निमखेडी परिसर, श्रीकृष्ण कॉलनी भागातील नागरिकांना हिवाळ्यातच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सुप्रीम कॉलनीत तब्बल १० दिवसानंतर पाणी पुरवठा होत असून या भागातील महिलांनी मंगळवारी मनपात शहर अभियंत्याचा दालनात जावून जाब विचारला होता.मनपाने आतापासून पाण्याचे नियोजन केले नाही तर शहरात पाण्यावरून वाद निर्माण होण्याची भिती आहे.
गरजेपेक्षा ३६ एमएलडी पाण्याची मागणी वाढली
एका दिवसात जळगाव शहराला ८० एमएलडी पाण्याची गरज भासते. तेवढेच पाणी मनपाकडून आधी उचलले जात आहे. मात्र, वाघूर धरणाकडून येणाºया पाईपलाईनसह शहरातील अनेक भागांमध्ये सुरु असलेल्या गळत्यांमुळे मनपाला दररोज ८० ऐवजी ११६ एमएलडी पाणी उचलावे लागत आहे. त्यामुळे गरजेपेक्षा मनपाकडून तब्बल ३६ एमएलडी पाणी जास्त उचलले जात आहे. उन्हाळ्यात निर्माण होणाºया पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी धोक्याची घंटा आहे.

Web Title: Lots of water can be consumed every day by millions of people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.