कांद्याला कमी भाव, चाळीसगावला शेतकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 09:07 PM2019-01-02T21:07:06+5:302019-01-02T21:07:33+5:30

लिलाव रोखले

Low price for farmers, rice farmers at Chalisgaon | कांद्याला कमी भाव, चाळीसगावला शेतकऱ्यांचा रास्तारोको

कांद्याला कमी भाव, चाळीसगावला शेतकऱ्यांचा रास्तारोको

Next

चाळीसगाव, जळगाव : इतर बाजार समित्यांमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत असताना चाळीसगाव बाजार समितीत व्यापाºयांनी भाव पाडले, असा रोष व्यक्त करीत कांदा उत्पादकांसह रयत सेनेने बुधवारी दुपारी १२ वाजता चाळीसगाव - नागद मार्गावरची वाहतूक रोखून धरत दोन तास रास्तारोको आंदोलन केले. शेतकºयांची समजूत काढल्यानंतर दुपारी तीन वाजता लिलाव पूर्ववत झाले. यामुळे चाळीसगाव - नागद मार्गावर वाहनांच्या लागल्या होत्या.
बाजार समितीत बुधवारी कांद्याची आवक चांगली झाली होती. एकुण २७५ वाहनांमधून उत्पादकांनी कांदा विक्रीस आणला होता. मार्केटच्या बाहेर लहान वाहनांमधून आणलेल्या कांद्याचे लिलाव दुपारी सुरु झाले. मात्र भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी चाळीसगाव - नागद मार्गावर ठिय्या देत आंदोलन सुरु केले. यावेळी रयत सेनेच्या गणेश पवार यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभाग घेतला.
आंदोलन चिघळू नये म्हणून बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक प्रदीप देशमुख, उपसभापती महेंद्र पाटील, अ‍ॅड. रोहिदास पाटील, सचिव अशोक पाटील यांनी आंदोलनकर्त्या शेतकºयांची समजूत काढली. रयत सेनेच्या पदाधिकाºयांशीही त्यांनी चर्चा करुन आंदोलन थांबविले.
राज्यातील लासलगाव, मनमाड, नांदगाव, उमराणे आदी बाजार समित्यांमध्ये कांद्याला साडे आठशे रुपये प्रति क्विंटलच्या पुढे भाव दिला जात आहे. मात्र चाळीसगाव बाजार समितीत फक्त साडे तीनशे ते साडेपाचशे रुपये प्रति क्विंटल दराने कांदा व्यापारी खरेदी करत असल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत बाजार समिती सभापती व प्रशासनाशी वेळोवेळी संपर्क साधुन तक्रारी केल्या असल्या तरी भाव ‘जैसे थे’च असल्याने बुधवारी शेतकºयांचा उद्रेक झाला, असे रयत सेनेचे म्हणणे होते. आंदोलनाने उग्र रुप धारण करु नये म्हणून पोलिसांनाही बोलविण्यात आले. इतर बाजार समित्यांप्रमाणे भाव मिळावा. अशी प्रमुख मागणी शेतकºयांची होती. आंदोलनात अनिल मराठे, विवेक शिंदे , मुकुंद पवार, संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते व शिंदी येथील शेतकरी अनिल जाधव, उमेश राठोड, हेमंत राठोड, रघुनाथ चव्हाण, लक्ष्मण दाभाडे तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे व सहकाºयांनी बदोबस्त ठेवला होता.


कांदा उत्पादकांनी आम्हाला बोलवल्यानंतर आंदोलनात भाग घेतला. बाजार समितीचे संचालक व व्यवस्थापनाशी चर्चा करुन शेतकºयांना ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळवून दिला. प्रतिक्विंटल मागे शेतकºयांचा साडे तीनशे रुपयांचा फायदा झाला आहे.
- गणेश पवार, अध्यक्ष, रयत सेना, चाळीसगाव

लिलावात सुरुवातील कमी दर्जाच्या कांद्याचा समावेश होता. बुधवारी झालेल्या लिलावात इतर बाजार समित्यांप्रमाणेच भाव दिला. शेतकºयांशी चर्चा केली. मुख्य लिलावात चांगले भाव दिले गेले. संचालकांनीही शेतकºयांशी चर्चा केली.
- अशोक पाटील, प्र.सचीव, बाजार समिती, चाळीसगाव.

Web Title: Low price for farmers, rice farmers at Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.