पिंप्राळा शाळा, मुलतानी रुग्णालयात कमी लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:19+5:302021-06-16T04:21:19+5:30

(डमी ८११) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला मध्यंतरी केंद्रांवर तोबा गर्दी उसळली होती, मात्र, रुग्णसंख्या जसजशी ...

Low vaccination at Pimprala School, Multani Hospital | पिंप्राळा शाळा, मुलतानी रुग्णालयात कमी लसीकरण

पिंप्राळा शाळा, मुलतानी रुग्णालयात कमी लसीकरण

Next

(डमी ८११)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला मध्यंतरी केंद्रांवर तोबा गर्दी उसळली होती, मात्र, रुग्णसंख्या जसजशी कमी झाली ही केंद्रावरील गर्दीही कमी झाली आहे. शहरातील काही विशिष्ट केंद्रांवरच अधिक लसीकरण होत असल्याची स्थिती आहे. यात शहरातील रोटरी भवन, रेडक्रॉस यासह छत्रपती शाहू महाराज रुग्णालय या केंद्रांवर सर्वाधिक लसीकरण झाले आहे. तर मुलतानी रुग्णालय व पिंप्राळा मनपा शाळेत कमी लसीकरण झाले आहे.

शहरात अगदी सुरुवातीला कमी लसीकरण झाले, मात्र, जसजसे टप्पे वाढविण्यात आले, लसीकरणाला गर्दी वाढली व सर्वच केंद्रांवर कमी-अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळतच गेला. यात तर मार्च, एप्रिलमध्ये केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. केंद्रांना यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. नागरिक सर्वच केंद्रांवर अगदी पहाटे चार पासून गर्दी करीत होते. मात्र, आता ही गर्दी ओसरली असून केंद्र ओस पडल्याचे चित्र दुपारच्या सुमारास निर्माण झाले आहे.

सर्वात जास्त लसीकरण झालेले केंद्र

रोटरी भवन २१,८८०

रेड क्रॉस रक्तपेढी २०,८००

छत्रपती शाहू महाराज रुग्णालय १७,७७९

नानीबाई रुग्णालय : ७,६३२

डी. बी. जैन ७,३०५

कमी लसीकरण झालेले केंद्र

पिंप्राळा मनपा शाळा - १,३६५

शाहीर अमरशेख २,३४७

मुलतानी रुग्णालय २,५४४

कांताई नेत्रालय २,९५०

स्वाध्याय भवन ३,६७६

चेतनदास मेहता रुग्णालय ६,२५६

शहरातील २१ टक्के लसीकरण

१ शहराची लोकसंख्या सुमारे ५ लाख ग्राह्य धरली तरी त्यापैकी लसीसाठी पात्र असणाऱ्यांची संख्या ही कमी आहे. मात्र, एकत्रित लोकसंख्येच्या तुलनेत सद्यस्थितीत शहरात २१ टक्के लसीकरण झाले आहे.

२ महापालिकेच्या केंद्रांचा विचार केला तर यात ४३,२४० नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला असून १४,२६३ नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

३ १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण अद्याप बंदच असल्यानेही ही केंद्र ओस असून हे लसीकरण लवकर सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

४ मध्यंतरी कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर वाढविण्यात आल्यामुळे नागरिकांची गर्दी कमी झाली आहे.

कोट

काही केंद्र उशिरा सुरू झाल्याने त्या ठिकाणी संख्या कमी आहे. मात्र, सर्वच केंद्रांवर मध्यंतरी नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता. मात्र, आता हा प्रतिसाद कमी झाला असून नागरिकांनी निकषानुसार लसीकरण करून घेऊन स्वत:ला सुरक्षित करून घ्यावे. - डॉ. राम रावलानी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी

कमी लसीकरण झाल्याची कारणे?

छत्रपती शाहू महाराज रुग्णालय हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शिवाय हे केंद्र सुरुवातीपासूनच सुरू असल्याने या केंद्रावर अधिक लसीकरण झाले आहे. ज्या केंद्रांवर लसकीकरण कमी आहे, ती केंद्र उशिराने सुरू झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, मुलतानी रुग्णालयाचे केंद्र हलवून आता काशिबाई उखाजी कोल्हे या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. या ठिकाणीही सध्या प्रतिसाद कमीच आहे.

Web Title: Low vaccination at Pimprala School, Multani Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.