खरीप पीककर्ज वाटपाचा निच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:37 PM2018-09-25T22:37:33+5:302018-09-25T22:38:52+5:30
जेमतेम ३३ टक्के कर्जवाटप
जळगाव: खरीप पीक कर्जवाटपात बँकांनी हात आखडता घेतल्याने पीककर्ज वाटपाचा यंदाच्या वर्षी निच्चांक गाठला आहे. खरीप पीककर्ज वाटपाची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत असून ही मुदत संपण्यास जेमतेम ४ दिवस उरले असताना उद्दीष्टाच्या जेमतेम ३३ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे. याउलट मागील वर्षी खरीपासाठी ५७.०६ टक्के कर्जवाटप झाले होते.
२०१८-१९ या वर्षात शेतकऱ्यांना २९४४ कोटींचे खरीप पीककर्जाचे वाटप करण्याचे उद्दीष्ट जिल्ह्यातील सर्व बँकांना देण्यात आलेले होते. मात्र कर्जमाफीच्या घोळ लांबल्याने शेतकरी कर्जमुक्त होऊ न शकल्याने बँकांनी त्यांना थकबाकीदार ठरवत पीककर्ज देणे टाळले. तर जिल्हा बँकेने पात्र ठरलेल्या शेतकºयांनाही पन्नास टक्केच कर्जवाटपाचे धोरण जाहीर करून टाकले. तर राष्टÑीयकृत, खाजगी व ग्रामीण बँकांनी कर्जवाटपाकडे सोयीस्कर पाठ फिरवली. त्यामुळे १ लाख ६८ हजार २६० खातेदारांना ९७० कोटी ८२ लाखांचे पीककर्ज वाटप झाले आहे. म्हणजेच एकूण उद्दीष्टाच्या केवळ ३३ टक्केच खरीप पीककर्जाचे वाटप झाले आहे.
जिल्हा बँकेकडून ५३ टक्के कर्जवाटप
जिल्हा बँकेला खरीपासाठी ८१३ कोटी ८७ लाखांचे पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र जिल्हा बँकेने १ लाख ३७ हजार २०९ खातेदारांना ४२७ कोटी ४७ लाखांचेच पीककर्ज वाटप केले आहे. म्हणजेच उद्दीष्टाच्या सुमारे ५३ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे.
इतर बँकांनी आदेश डावलले
राष्टÑीयकृत, खाजगी व ग्रामीण बँकांनी तर शासनाचे पीककर्ज वाटपाचे आदेश धाब्यावर बसविल्याचेच चित्र दिसून येत आहे. राष्टÑीयकृत बँकांना खरीपाचे १७२४ कोटी २६ लाखांचे उद्दीष्ट दिलेले असताना त्यांनी २५ हजार ६१७ श्ोतकºयांना ४४० कोटी ३५ लाखांचेच कर्ज वाटप केले आहे. म्हणजेच उद्दीष्टाच्या केवळ २६ टक्केच कर्जवाटप केले आहे. तर खाजगी बँकांना ३५६ कोटी ३६ लाखांचे उद्दीष्ट दिलेले असताना त्यांनी ४६५० खातेदारांना ९४ कोटींचेच कर्ज वाटप केले आहे. म्हणजे उद्दीष्टाच्या केवळ २६ टक्के कर्ज वाटप केले आहे. तर ग्रामीण बँकांनी उद्दीष्टाच्या ३३ टक्के कर्जवाटप केले आहे.