तत्वनिष्ठ गुरुसाठी एकनिष्ठपणा आवश्यक - दादा महाराज जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:59 PM2019-07-17T12:59:34+5:302019-07-17T13:00:03+5:30

जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ डॉक्टरांच्या सत्कार

Loyalness for the devoted master needs - Dada Maharaj Joshi | तत्वनिष्ठ गुरुसाठी एकनिष्ठपणा आवश्यक - दादा महाराज जोशी

तत्वनिष्ठ गुरुसाठी एकनिष्ठपणा आवश्यक - दादा महाराज जोशी

googlenewsNext

जळगाव : जो पर्यंत मातृ-पितृ सेवा होत नाही तोपर्यंत गुरु तत्व संभाळता येत नाही आणि तत्वनिष्ठ गुरु हा एकनिष्ठ असल्याशिवाय मिळत नाही, असा सल्ला चिमुकले श्रीराम मंदिराचे गादीपती ह.भ.प.दादा महाराज जोशी यांनी दिला.
गुरुपौर्णिमेनिमित्त कै. वैद्य भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी दुपारी आयएमए सभागृहात ज्येष्ठ डॉक्टरांच्या कृतज्ञता पूर्वक गौरव सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी दादा महाराज जोशी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते. व्यासपीठावर दादा महाराज जोशी यांच्यासह प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैद्य जयंत जहागिरदार, सत्कारार्थी ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.उल्हास पाटील व बालरोगतज्ज्ञ डॉ.राजेंद्र पाटील उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्वलन, धन्वंतरी पुजन झाले. वैद्य योगेंद्र कासट यांनी धन्वंतरी स्तवन सादर केले. परिचय वैद्य अमित चौधरी यांनी करुन दिला.
सत्कारमूर्ती डॉ.उल्हास पाटील व डॉ.राजेंद्र पाटील यांना दादा महाराज जोशी यांना ह.भ.प.दादा महाराज जोशी यांच्याहस्ते पुष्पहार, शाल, श्रीफळ, भेटवस्तू व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी उल्लेखनीय कार्याबद्दल वैद्य नरेंद्र गुजराथी, वैद्य हेमंत बाविस्कर आणि एन.डी.पाटील, आरती पाटील, प्रीती गुजराथी आदींचा सत्कार करण्यात आला.
गुरुशिष्य परंपरा माणसाला निर्भय करणारी
भारतीय संस्कृती मातृशक्तीवर आधारीत असून गुरुशिष्य परंपरा माणसाला निर्भय करते असे ह.भ.प.दादा महाराज जोशी यांनी नमूद केले. प्रतिष्ठानतर्फे डॉक्टरांविषयी कृतज्ञता म्हणजे वंदन करण्याचे कार्य आहे. कारण सत्कारमूर्ती म्हणजे मूर्तीत देवत्व असते आणि डॉक्टर म्हणजे धन्वंतरी अर्थात विष्णूचे रुपच आहे. स्वकर्तृत्व सर्वश्रेष्ठ असते. अशा कर्तृत्ववान डॉक्टरांचा गुरुपौणिमेला सत्कार करणे ही आदर्श गुरु परंपरा असून ती माणसाला निर्भय बनविते असेही ते म्हणाले.
राजकारणापेक्षा वैद्यकीय सेवा कायम चांगली
सत्काराला उत्तर देताना डॉ.उल्हास पाटील यांनी शिक्षणापासून वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना असा प्रवास सांगितला. पुरुष डॉक्टरांनी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्य करण्यास डॉ.अविनाश आचार्य यांच्या कार्यपद्धतीमुळे शक्य झाले असे सांगून ही परंपरा येथील दिग्गज डॉक्टरांनी पुढे नेल्याचेही त्यांनी नमीद केले. बरे झाले ते राजकारणार नव्हते, असाही उल्लेख त्यांनी करताच हशा पिकला. राजकारणापेक्षा वैद्यकीय सेवा कायम चांगली आहे, असेही ते म्हणाले.
यशात गुरुंचा मोठा वाटा
डॉ.राजेंद्र पाटील यांनी वडीलच शिक्षक असल्यामुळे घरी आणि शाळेत तेच गुरु तसेच घर म्हणजेच गुरुकुल झाल्याने चांगले संस्कार झाले. जे चांगले झाले, यश मिळाले त्यात गुरुंचा मोठा वाटा असतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन वैद्य आनंद दशपूत्रे यांनी केले तर वैद्य जयंत जहागिरदार यांनी आभार मानले. माधुरी जहागिरदार व मधुरा जहागिरदार यांनी स्वागत केले. कार्यक्रमास वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Loyalness for the devoted master needs - Dada Maharaj Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव