दैव बलवत्तर, बसच्या चाकाखाली दुचाकी येऊनही बचावले तिघ जण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:24 PM2019-12-31T12:24:22+5:302019-12-31T12:25:03+5:30
महामार्गावर बसच्या धडकेत तीन जण जखमी
जळगाव : रावेर येथून संगमनेर जात असलेल्या एस.टी.बसने धडक दिल्याने दुचाकी बसच्या चाकाखाली आली तर दुचाकीस्वार शुभम बारकु पाटील (रा.दोंडाईचा, जि.धुळे), सौरभ राजेंद्र देवरे (रा.हिंदरुन, ता.धुळे) अभीजीत जयंत पाटील (रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) हे तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी महामार्गावर दूरदर्शन टॉवर जवळ घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, रावेर आगाराची रावेर संगमनेर ह बस (क्र.एम.एच.२० बी.पी.२३९८) भुसावळकडून जळगाव शहरात येत असताना दूरदर्शन टॉवरजवळ समोर चालणाऱ्या दुचाकीस्वाराने (क्र.एम.एच.१८ बी.पी.८४५६) अचानक ब्रेक दाबल्याने तो दुचाकीसह कोसळला, त्याच वेळी बस थेट दुचाकीवर धडकली. चाकाखाली आल्याने दुचाकीचे नुकसान झाले. या अपघातात दुचाकीस्वार बालंबाल बचावला. दरम्यान, बस चालक दीपकसिंग चंदनसिंग परदेशी (रावेर आगार) यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अतुल पाटील करीत आहे.