लक्झरी बसचा अपघात, चालकाचा मृत्यू, १२ प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 11:37 IST2023-09-16T11:36:52+5:302023-09-16T11:37:11+5:30
ही घटना शनिवारी सकाळी ८:३० वाजता पिंपळकोठा ता. एरंडोलनजीक घडली.

लक्झरी बसचा अपघात, चालकाचा मृत्यू, १२ प्रवासी जखमी
- बी.एस. चौधरी
एरंडोल (जि.जळगाव) : भरधाव लक्झरी बस पुलावरुन खाली कोसळली. यात चालक ठार तर १०- १२ प्रवासी जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ८:३० वाजता पिंपळकोठा ता. एरंडोलनजीक घडली.
ही लक्झरी बस राजस्थानकडून जळगावमार्गे औरंगाबादकडे जात होती. पिंपळकोठानजीक एका छोट्या पुलाच्या कठड्यावर बस धडकली आणि खाली कोसळली. यातील मृत चालकाचे नाव कळू शकले नाही. जखमींपैकी तीन जणांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.