वेडा गुलमोहर

By admin | Published: June 11, 2017 11:35 AM2017-06-11T11:35:14+5:302017-06-11T11:35:14+5:30

वीकेण्ड स्पेशलमध्ये ललित या सदरात सुभाष पाटील यांनी केलेले लिखाण

Mad gulmohar | वेडा गुलमोहर

वेडा गुलमोहर

Next

 तो अंगणी, म्हणालं तर दाराशी जरा घर शेजारी! काही वेळेला बाजू घेणारा, तर काही वेळेला त्याची! मी त्याच्यावर कधी कधी खूप रागवायचो! चक्क कट्टीùù फूùù देखील करतो! पण तो कसला काय? रागावलो तरी हसतो. काय म्हणावं या ‘‘वेडय़ा गुलमोहराला!’’

सदानकदा फुलण्याची याची भाषा. मी फुलेन! मी बहरेनं! मी आनंद देईन! निसर्गाची जात मी कशी सोडेने! तुम्हा पुरुषांची जात काही न्यारी. तुमचा तर माणसावर देखील विश्वास नाही?  तशी आम्ही झाडं! कधी करत नाही आम्ही खोडी! नाही लबाडी! भरभरून द्यायचं! मनसोक्त फुलायचं..  निर्माल्य व्हायचं! असं आमचं जीणं! कोणावर रुसवा नाही? कोणावर उपकार नाहीत? कर्तव्य करीत जाणं? आणि  फुलणं! हेच आमचं काम! आमच्याजवळ विश्वासघात नाही. म्हणून भ्रष्टाचाराचे हात नाहीत! आमचं जग स्वतंत्र आहे. आम्ही मुक्त आहोत! येथे ‘खुर्ची’साठी भांडणं नाहीत? जिणं कसं मस्त! म्हणून जीवन सुस्त! अस्सं आमचं जग! अस्सं आमचं जीवन! 
खरं म्हणजे तो गुलमोहर.. खूप हसायचा. हसतां.. हसतां हिरवा गर्द व्हायचा आणि म्हणायचा कसा? या मित्रांनो, बसा अन् हसा. मारा थोडय़ा गप्पा. थोडय़ा सुखाच्या! अन् थोडय़ा दु:खाच्या!
तसा तो  रोज खुणवायचा. काही कळेना. काही वेळेला तर तो  चक्क वाकोल्याही दाखवायचा! म्हणायचा ये ना जवळ? लाल गर्द फुलांतून फुलून म्हणायचा ‘‘पहा मी असा फुलतो? असा बहरतो.. असा हसतो. आणि माझं जीवन सार्थकी लावतो. आणि तू काय करतोस? दुस:यांची प्रगती पाहून रुसतोस? काय तुमची जात! तसं पाहिलं तर त्याच आणि माझं नात काय? तो माझा कोण? मी त्याचा कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधता.. शोधता  अर्धा झालो. 
गुलमोहर असा कधी.. कधी मूडमध्ये येतो. खूप काही बोलतो. बोलता.. बोलता हसतो. आणि हसता.. हसता माणसाच्या स्वार्थी वृत्तीवर तुटतो. मी त्याला सहज विचारलं? ‘‘तुझा पुनजर्न्मावर विश्वास आहे का? आणि असलास तर तू पुढील जन्म कोणता घेशील?’’ तो मला म्हणतो कसा? ‘‘अहो, इथं जाणवला माणूस! स्वार्थी, पुन्हा जन्म कशासाठी? जे करायचं ते आताच करायच! जो जन्म मिळाला तो सत्कारणी लावा! स्वार्थी विचार सोडा!’’ तसा गुलमोहर  दोस्त. त्याच्या छायेत कधी  बसतो. तर कधी त्याच्याशी मनसोक्त बोलतो. तो तर प्रामाणिक मित्र. म्हणून तो मनापासून भावतो! माणसांपेक्षा तो कितीतरी बरा. कधी कुठली अपेक्षा नाही? की उपकाराची भाषा नाही! देत रहाणे.. हाचं त्याचा धर्म! देता.. देता कोणासाठी तरी संपून जाणे! हे त्याचं काम? तेच त्याचं जीवन. त्यातच वाहून जावून ‘निर्माल्य’ होणं? फक्त फुलायचं. फक्त आनंद द्यायचं! आणि आनंद देता. देता चक्क माणसाला मोहीत करायचं. असा हा ‘‘वेडा गुलमोहर!’’ 
- सुभाष पाटील
 

Web Title: Mad gulmohar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.