अवघ्या ६० हजारात बनविली दुचाकीपासून चारचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 09:33 PM2018-11-06T21:33:11+5:302018-11-06T21:35:28+5:30

गिरणा कॉलनीतील रहिवाशी परिमल भगवान पाटील (वय २२) या विद्यार्थ्याने दुचाकीपासून चारचाकी वाहन तयार करीत अवघ्या ६० हजार रुपयात कारचे स्वप्न साकार केले आहे.

Made in 60 rup of four-wheelers | अवघ्या ६० हजारात बनविली दुचाकीपासून चारचाकी

अवघ्या ६० हजारात बनविली दुचाकीपासून चारचाकी

Next
ठळक मुद्देभडगाव येथील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची कमाल२० हजाराची दुचाकी घेऊन त्यात केले बदलएका लीटरला मिळतोय ४० किलोमीटर एव्हरेज

भडगाव : येथील गिरणा कॉलनीतील रहिवाशी परिमल भगवान पाटील (वय २२) या विद्यार्थ्याने दुचाकीपासून चारचाकी वाहन तयार करीत अवघ्या ६० हजार रुपयात कारचे स्वप्न साकार केले आहे. सध्या ही अजब कार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
चार महिन्यात तयार केली कार
परीमल पाटील यांनी मोटार सायकलच्या माध्यमातून ही कार तयार केली आहे. त्यासाठी ४ महिन्याचा कालावधी व ६० हजार रुपयांचा खर्च आला. परिमल याने यापूर्वी २० हजार रुपयात ही दुचाकी आणली होती. त्यातूनच या दुचाकीमध्ये काही बदल केले.
एका लीटरला ४० किलोमीटर
परिमल याने दुचाकीच्या आजूबाजूने पत्रा व फायबर लावले. वेल्डिंग करीत चारचाकी कार बनवली आहे. सफेद आकर्षक रंगाने ही कार चकाकत आहे.
एका लीटरला ४० किलोमिटर प्रवास होत आहे. यात एकावेळी ४ जण प्रवास करू शकतात. त्यामुळे कमी खर्चात जास्त जणांना प्रवास करता येत आहे.
परिमल धुळे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी
परिमल हा धुळे येथील एसएसव्हीपीएस कॉलेज आॅफ इंजिनियरींग कॉलेज मध्ये सिव्हील इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. पाटबंधारे विभागातातील कर्मचारी बी.आर.पाटील यांचा तो मुलगा आहे.

Web Title: Made in 60 rup of four-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.