मुलीच्या लग्नासाठी केली २६ दुचाकींची चोरी
By admin | Published: June 30, 2016 02:12 PM2016-06-30T14:12:17+5:302016-06-30T14:12:17+5:30
पोलीस आयुक्तालयात लिपिक असलेल्या सरफराज तडवी (रा.कुसुंबा ता.रावेर) याला जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दुचाकी चोरताना रंगेहाथ पकडले
Next
>जळगाव : पुणे पोलीस आयुक्तालयात लिपिक असलेल्या सरफराज तडवी (रा.कुसुंबा ता.रावेर) याला जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दुचाकी चोरताना रंगेहाथ पकडले. बिंग फुटल्याची जाणीव होताच त्याने आपण निलंबित पोलीस आहोत, अशी बतावणी केली. दरम्यान, त्याने जिल्हाधिकारी कार्यालय, उपनिबंधक कार्यालयात, जिल्हा रुग्णालय व न्यायालय आवारातून आतापर्यंत तब्बल २६ दुचाकी चोरल्या आहेत. मुलीच्या लग्नासाठी चोरी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
बाविस्कर व गिरनारे यांनी तडवी याला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याने मी निलंबित पोलीस कर्मचारी आहे, असे सांगून त्याचे ओळखपत्र दाखविले. जिल्हाधिकारी कार्यालयात काम असल्याने येथे आलो होतो, असे सांगितले. त्यावर आम्हीही तेथेच नोकरीला आहोत, कोणाशी व काय काम आहे असे विचारल्यावर त्याची भंबेरी उडाली.