जळगाव जिल्ह्यात घरफोड्या करणारी मध्यप्रदेशची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 10:57 PM2017-11-02T22:57:13+5:302017-11-02T22:58:54+5:30
जिल्ह्यात घरफोडी करुन धुमाकूळ घालणारी मध्यप्रदेशातील चार जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल असा ५ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या टोळीने जिल्ह्यात अनेक घरफोड्या केल्या असून १३ ठिकाणच्या घरफोड्यांची त्यांनी कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व यावल पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबविली होती.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२ : जिल्ह्यात घरफोडी करुन धुमाकूळ घालणारी मध्यप्रदेशातील चार जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल असा ५ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या टोळीने जिल्ह्यात अनेक घरफोड्या केल्या असून १३ ठिकाणच्या घरफोड्यांची त्यांनी कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व यावल पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबविली होती.
यावल येथे ३१ आॅगस्ट रोजी रात्री शकील खान सुलतान खान (वय ५७, रा.बाबा नगर, यावल) यांच्या घरात बेडरुमच्या खिडकीतून हात घालून दरवाजाची कडी उघडून चोरट्यांनी ८५ हजार रुपये रोख, ३ लाख ६८ हजार रुपये किमतीचे २५ तोळे सोन्याचे दागिने, २० हजार रुपये किमतीचे चांदीचे बिस्कीट व २१ हजार रुपये किमतीचे ३ मोबाईल असा ४ लाख ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी स्थानिक गुन्हे शाखा व यावल पोलीस यांना संयुक्तपणे तपास करण्याचे आदेश दिले होते.
आरोपींकडून असा हस्तगत केला मुद्देमाल
सुनील बारेला याच्याकडून ३ लाख २२ हजार १८०, मुकेश चौहान याच्याकडून ३३ हजार ११०, राकेश बारेला याच्याकडून ८० हजार १२० तर अल्पवयीन आरोपीकडून १ लाख २४ हजार ६३५ असा एकुण ५ लाख ६० हजार ७९५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यात रोख रक्कम, दागिने व नऊ मोबाईलचा समावेश आहे.
या पथकाने केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुनील कुराडे, यावलचे निरीक्षक दत्तात्रय परदेशी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक सागर शिंपी, उपनिरीक्षक अशोक अहिरे, यावलचे युनुस तडवी, संजीव चौधरी, सिकंदर तडवी, संजय देवरे, संजय तायडे, विकास सोनवणे, सुशील घुगे, राजेश महाजन, सतीष भोई, राहूल चौधरी, जाकीर अली सैय्यद, एलसीबीचे मनोहर देशमुख, विजय पाटील, रवींद्र पाटील,नरेंद्र वारुळे, सुशील पाटील, आरसीपीचे अजय सपकाळे, गणेश पाटील, अमोल पाटील, मदन डेढवाल, विशाल पाटील, नितीन भालेराव, पवन देशमुख, गोपाळ गायकवाड, विजय बच्छाव व हनुमान वाघेरे यांच्या पथकाने सातपुडा जंगलात घेराव घालून सुनील अमरसिंग बारेला (वय २० रा.गौºयापाडा, ता.चोपडा), मुकेश काशिनाथ चौहान(वय २२ रा.खापरखेडा, ता.सेंधवा, जि.बडवाणी), राकेश उर्फ रायक्या रामलाल बारेला (वय २२ रा.देवळी, ता.वरली, जि.बडवाणी) व एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.अटकेतील चारही आरोपींना पोलीस निरीक्षक कुराडे यांनी गुरुवारी दुपारी पोलीस अधीक्षक कराळे यांच्याकडे हजर करण्यात आले.