महा जनादेश यात्रा रथावर बोदवडला खडसेंना घेतले सोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:28 PM2019-08-24T22:28:30+5:302019-08-24T22:28:36+5:30
बोदवड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे बोदवड शहरात दुपारी १२ वाजेच्या सुमारास आगमन झाले असता नागरिकांनी ...
बोदवड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे बोदवड शहरात दुपारी १२ वाजेच्या सुमारास आगमन झाले असता नागरिकांनी भव्य स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री तथा आमदार एकनराथराव खडसे, जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर हे होते.
यात्रा भुसावळ येथून येत बोदवड तालुक्यातील विचवा गावापासून भांनखेडा, साळशिंगीमार्गे बोदवड शहरात दाखल झाली. पूर्ण जिल्ह्यात खडसे मुख्यमंत्र्यांसमवेत यात्रा रथावर कोठेही नव्हते मात्र बोदवड येथे त्यांच्या मतदारसंघात या रथावर स्वार होण्याची संधी लाभली. यावेळी खडसे म्हणाले की, दुष्काळग्रस्त बोदवड तालुक्यातील ओडिए पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी ४८ कोटीचा निधी दिल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.
काळा झेंडा दाखविण्याचा प्रयत्न
यात्रा मलकापूर कडे मार्गस्थ होत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पाणी टंचाईचे निवेदन दिले, तर पुढे मलकापूर चौफुलीवर सागर पाटील या कार्यकर्त्यांने याच प्रश्नी जनादेश यात्रेला काळा झेंडा दाखविण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी धाव घेऊन या युवकास अगोदरच ताब्यात घेतले.