नांदेडला महादेवाची पिंड जीर्णोद्धार कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:35 AM2021-09-02T04:35:08+5:302021-09-02T04:35:08+5:30

नांदेड, ता. धरणगाव : येथील मुख्य गावठाण चौकाजवळील मारुतीच्या पारावरील महादेवाच्या पिंडीच्या जीर्णोद्वाराचा कार्यक्रम लोकवर्गणीतून १ सप्टेंबरपासून ४ सप्टेंबरपर्यंत ...

Mahadev's ingot restoration program at Nanded | नांदेडला महादेवाची पिंड जीर्णोद्धार कार्यक्रम

नांदेडला महादेवाची पिंड जीर्णोद्धार कार्यक्रम

Next

नांदेड, ता. धरणगाव : येथील मुख्य गावठाण चौकाजवळील मारुतीच्या पारावरील महादेवाच्या पिंडीच्या जीर्णोद्वाराचा कार्यक्रम लोकवर्गणीतून १ सप्टेंबरपासून ४ सप्टेंबरपर्यंत चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.

यात १ रोजी महादेवाच्या पिंडीसह नंदीची गावातून सवाद्य मिरवणूक, २ रोजी जुन्या पिंडीचे व नंदीचे विधिवत विसर्जन व नवीन पिंडीची स्थापना, ३ रोजी स्थापित देवता पूजन व प्राणप्रतिष्ठा, ४ रोजी पूर्णाहुती तसेच २ रोजी रात्री ८ ते १० जळकेकर महाराज यांचे कीर्तन, ३ रोजी बी. एच. नारखेडे यांचे कीर्तन व ४ रोजी तुळशीदास महाराज यांच्या कीर्तनांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महादेवाची पिंड व नंदीची मूर्ती उज्जैन येथून आणण्यात आली आहे तसेच पारावरील हनुमान मंदिराच्या व नागनाथ मंदिराच्या वर स्लॅब टाकण्याच्या कामासह भिंतीचे काम लोकवर्गणीतून पूर्ण करण्यात येऊन पाराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

Web Title: Mahadev's ingot restoration program at Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.