ओबीसी, दलितांचे आरक्षण कमी करुन ते मुस्लिमांना देण्याचा महाविकास आघाडीचा घाट - अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 02:51 PM2024-11-10T14:51:55+5:302024-11-10T14:53:49+5:30
ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.
प्रशांत भदाणे
जळगाव - ओबीसी आणि मुस्लिमांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा घाट महाविकास आघाडीने घातला आहे. म्हणूनच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना 10% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. आरक्षणाची मर्यादा ही 50 टक्क्यांपेक्षा जास्त होऊ शकत नाही. त्यामुळे ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील फैजपूर येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत केला.
जोपर्यंत संसदेत भाजपचा खासदार आहे तोपर्यंत मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही, असंही अमित शाह यावेळी म्हणाले.या सभेला भाजप नेते गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार उपस्थित होते. फैजपूर येथील जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर ही सभा पार पडली.
अमित शाह भाषणात नेमकं काय म्हणाले?
सर्वांची माफी मागतो, मला यायला उशीर झाला
भाजपचा जाहीरनामा घोषित करायचा होता, म्हणून उशीर झाला... माफ करा
आजचा 10 नोव्हेंबरचा दिवस महत्वाचा आहे, पूर्ण देश शिवप्रताप दिन म्हणून साजरा करतो
1659 मध्ये शिवाजी महाराजांनी आजच्याच दिवशी अफजल खानाचा वध केला होता
आजच्या दिवशी मी आवाहन करतो, शिवरायांच्या विचारांवर काम करणाऱ्या महायुतीला पाठिंबा द्या
आमच्यासमोर असणाऱ्या विरोधकांना लोकांशी काही देणं घेणं नाही, त्यांना फक्त सत्ता हवी आहे
शिवरायांच्या विचारांवर आधारित महाराष्ट्राला एक नंबरचे राज्य बनवायचं आहे
काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र लढतयत
राहुल गांधी सावरकरांचा विरोध करतायत
उद्धव ठाकरेंना आव्हान, तुमच्यात दम असेल तर राहुल गांधींकडून सावरकर यांच्याबद्दल दोन शब्द चांगले बोलून दाखवा
आमची युती ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी, शिवरायांच्या विचारांवर पुढे नेणारी... महाराष्ट्राला समृध्द करणारी
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण देण्याचा दावा
म्हणजे 50 टक्के आरक्षण कमी करण्याचा घाट, ओबीसी आणि दलितांच्या आरक्षणाचा लाभ कमी करण्याचा प्रयत्न
सत्ता हवी म्हणून विरोधक आंधळे झाले आहेत
पण जोपर्यंत संसदेत भाजपचा खासदार आहे तोपर्यंत मायनॉरिटीला आरक्षण मिळू देणार नाही
कलम 370 आम्ही हटवले तेव्हा सर्व विरोधक काव काव करत होते
हे कलम काढले तेव्हा विरोधक म्हणायचे खुनाच्या नद्या वाहतील पण 6 वर्षे झाली कुणाची हिंमत झाली नाही काही करण्याची
पुरी आणि पुलवामामध्ये हल्ला झाला तेव्हा आपण ठोस कारवाई केली, 10 दिवसात पाकिस्तानच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला
देशाच्या सुरक्षेला आम्ही महत्व दिलंय
अयोध्येत राम मंदिर बनायला हवं होतं की नाही
काँग्रेसने, शरद पवारांनी 70 वर्षे राम मंदिर हा विषय लटकवून ठेवला होता
मोदींनी पाचच वर्षात केस जिंकली आणि मंदिर बांधलं
साडे पाचशे वर्षानंतर पहिल्यांदा रामलल्लाने आपल्या मंदिरात दिवाळी साजरी केली
फक्त राम मंदिर नाही, तर औरंगजेबने तोडलेले काशी विश्वनाथ कॉरिडॉर केला
एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी चांगलं काम केलंय
वक्फ बोर्डाच्या विषयावर मोदींनी निश्चय केलाय
सोनिया, मनमोहन आणि शरद पवारांनी त्यांची सत्ता असताना महाराष्ट्राला किती निधी दिला...
फक्त 1 लाख 91 हजार कोटी
मोदींनी त्यांच्या काळात 10 लाख 90 हजार कोटी दिले
उत्तर महाराष्ट्रासाठी आम्ही अनेक कामे केली
महाविकास आघाडीने लाडकी बहिण योजनेचा विरोध केला, त्यांचं सरकार आलं तर या योजनेचा लाभ बंद करतील
आमचं सरकार आलं तर 1500 ऐवजी 2100 रुपये लाभ देऊ
महाराष्ट्रात उद्योग येत नाहीये हा विरोधकांचा आरोप आहे
जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर होता
महाराष्ट्राला नंबर एकवर नेण्याचा आमचा प्रयत्न असेल
महायुतीला समर्थन द्या
आमच्या सर्व विरोधकांना मोठ्या बहुमताने निवडून द्या
मोदींचे हात मजबूत करा, देशाला सुरक्षित करा
मुस्लिम आरक्षणाला अटकाव करा