Gulabrao Patil : "मविआची तिकिटे जाहीर होऊ द्या, त्यानंतर विरोधक आपल्याकडे दिसतील"; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 11:34 AM2024-10-23T11:34:22+5:302024-10-23T11:35:13+5:30
Maharashtra Assembly Election 2024 And Gulabrao Patil : महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली नाहीत. नावे जाहीर होऊ द्या त्यानंतर सर्व विरोधकही आपल्यासोबत येतील असा गौप्यस्फोट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
जळगाव - जिल्ह्यात महायुतीला लोकसभेत जे यश मिळाले तेच विधानसभेतही मिळेल. अद्याप महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली नाहीत. नावे जाहीर होऊ द्या त्यानंतर सर्व विरोधकही आपल्यासोबत येतील असा गौप्यस्फोट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
मंगळवारी आदित्य लॉन येथे जळगाव तालुक्याच्या महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीच्या बुथचे सूक्ष्म नियोजन करून एकजुटीने आपले गाव व आपला बुथ ही जबाबदारी पार पाडावी. महायुतीचा भगवा फडकविण्यासाठीसाठी सज्ज राहा. विरोधी उमेदवार कोण..? यापेक्षा महायुतीचा धनुष्यबाण हेच डोळ्यासमोर ठेवा. धरणगाव येथे २४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा गुलाबराव पाटील आहे, असे समजून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. खासदार स्मिता वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती...
या मेळाव्यात भाजपाचे निरीक्षक नितीन पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिता कोल्हे- माळी, अजित पवार गटाचे योगेश देसले, भाजपा तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष भूषण पवार, भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, शिंदेसेनेचे संजय पाटील, सुभाष पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, पवन सोनवणे, गोपाल चौधरी, भाजपाचे गोपाळ भंगाळे, मनोहर पाटील, ईश्वर पाटील, माजी सभापती मीना पाटील, शिंदेसेनेचे उपजिल्हा प्रमुख रवींद्र कापडणे, अनिल भोळे, माजी सभापती राजेंद्र चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.