मतदान ड्युटीवर कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे वाहन घसरले, ४ महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 12:02 IST2024-11-19T11:59:36+5:302024-11-19T12:02:30+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत मतदान ड्युटीवर कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे वाहन रस्त्यावरुन खाली घसरले. त्यात चार महिला कर्मचारी जखमी झाल्या.

मतदान ड्युटीवर कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे वाहन घसरले, ४ महिला जखमी
आर. ई. पाटील
किनगाव (जि.जळगाव) - विधानसभा निवडणुकीत मतदान ड्युटीवर कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे वाहन रस्त्यावरुन खाली घसरले. त्यात चार महिला कर्मचारी जखमी झाल्या. ही घटना किनगाव ता. यावल नजीक मंगळवारी सकाळी ७ वाजता घडली.
शिक्षण विस्तार अधिकारी मीनाक्षी रामदास सुलताने, ज्योती गोपीचंद भादले, कविता बाविस्कर आणि लतीफा परवीन चांद खान अशी जखमी महिलांची नावे आहेत. जखमींवर किनगाव येथे उपचार करुन त्यांना चोपडा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.