निवडणूक प्रक्रिया आटोपून परतणारा बीएलओ अपघातात ठार 

By चुडामण.बोरसे | Updated: November 20, 2024 22:15 IST2024-11-20T22:15:00+5:302024-11-20T22:15:59+5:30

बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 

maharashtra assembly vidhan sabha election 2024 blo returning after election process killed in accident  | निवडणूक प्रक्रिया आटोपून परतणारा बीएलओ अपघातात ठार 

निवडणूक प्रक्रिया आटोपून परतणारा बीएलओ अपघातात ठार 

चोपडा (जि. जळगाव) : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आटोपून घरी परतणारे बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) दुचाकी अपघातात ठार झाल्याची घटना चोपडा  (जि.जळगाव) येथे बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. 

लक्ष्मीकांत वासुदेव पाटील  (४८) असे या ठार झालेल्या बीएलओचे नाव आहे. ते अनवर्दे खुर्द ता. चोपडा येथे शिक्षक आणि बीएलओ म्हणून कार्यरत होते. बुधवारी रात्री ते चोपडा येथून बभळाज ता. शिरपूर या आपल्या मूळ गावी दुचाकीने जात होते. त्याचवेळी समोरुन आलेल्या दुसऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यात ते ठार झाले.  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.  त्यांची अंत्ययात्रा २१ रोजी बभळाज येथून निघणार आहे.

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 blo returning after election process killed in accident 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.